स्पोर्ट

72 तास सलग बॅटींग करून मुंबईच्या ‘या’ खेळाडूने मोडला विक्रम

मुंबईच्या सिद्धार्थ मोहितेने सर्वाधिक जास्त वेळ फलंदाजी करण्याचा विक्रम मोडला आहे. सलग 72 तास, पाच मिनिटे क्रीजवर खेळून त्याने हा विक्रम केला आहे.

Mumbai Player : मुंबईतील सिद्धार्थ मोहिते या 19 वर्षीय खेळाडूने नेट सेशनमध्ये 72 तास, 05 मिनिटे क्रीजवर राहून सर्वात जास्तवेळ फलंदाजी करण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंद होण्याची वाट सिद्धार्थ पाहत आहे.

७२ तास फलंदाजी

19 वर्षीय मोहितेने गेल्या आठवड्याच्या शेवटी 72 तास आणि 05 मिनिटे फलंदाजी करून विराग मानेचा 2015 मधील 50 तासांचा विक्रम मोडला आहे. मी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाल्याने मला खूप आनंद होत आहे. मी वेगळा आहे हे लोकांना दाखवण्याचा हा एक मार्ग होता, अशी भावना सिद्धार्थने व्यक्त केली आहे.

ही गोष्ट करण्यासाठी सगळे मला नकार देत होते. त्यानंतर मी ज्वाला सिंग सरांशी संपर्क साधला आणि त्यांनी पवरानगी दिली. त्यांनीच मला संपूर्णरित्या पाठिंबा दिला. नियमानुसार फलंदाजाला तासाभरात पाच मिनिटांची विश्रांती घेता येते. तसाच नियम मोहितेने पाळला आणि आता मोहितेचे रेकॉर्डिंग आणि संबंधित कागदपत्रे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे पाठवण्यात आली आहेत.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद पाठवण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत. सिद्धार्थचा चुलत भाऊ वैभवने त्याच्या फलंदाजीवर 3 दिवस लक्ष ठेवण्यासाठी साक्षीदारांची व्यवस्था केली. फलंदाजीचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्याचे काम एका व्यक्तीला देऊ केले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments