Uncategorized

पावसाळ्यात मुंबई बुडणार नाही, नगरविकास मंत्र्यांचा मास्टर प्लॅन ठरणार का यशस्वी?

Mumbai Rain News नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत साठणाऱ्या पाण्यावर उपाय सुचवला आहे. पावसाळ्यात मुंबई बुडणार नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

Mumbai Rain News : 2005 मध्ये मुंबईत अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरानंतर ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत प्रस्तावित एकूण 58 प्रकल्पांपैकी 41 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. कामाला सुरुवात होणार आहे, तर उर्वरित चारपैकी तीन योजनांच्या निविदा मागवण्यात आल्या आहेत.

एका योजनेच्या भूखंडाच्या वादाचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. ब्रिमस्टोवॅड योजनेंतर्गत सुचविलेल्या 8 पंपिंग स्टेशनपैकी 6 पंपिंग स्टेशनचे काम प्रगतीपथावर आहे. अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. आता मुंबईत पूर येणार नाही किंवा कितीही मोठा पाऊस आला तरी दरवर्षीप्रमाणे मुंबई पाण्यात जाणार नाही, असंही शिंदे म्हणाले.

मान्सूनला तोंड देण्यासाठी सरकार आणि बीएमसीने उत्तम व्यवस्था केली आहे. शिंदे यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली. प्रश्नोत्तरादरम्यान भाजप सदस्य परिणय फुके यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते.

2016 मध्ये 32 पैकी 24 कंत्राटदारांची चौकशी करण्यात आली होती. गठित समितीच्या चौकशी अहवालाच्या आधारे 3 कंत्राटदारांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोषी आढळलेल्या 14 कर्मचाऱ्यांना निलंबितही करण्यात आले आहे.

ब्रिमस्टोवॅडचं काम काय?

ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाला 1993 साली सुरुवात झाली. महापालिकेकडून दरवर्षी या प्रकल्पावर कोट्यवधींचा खर्च केला जातो. अतिवृष्टीच्या काळात समुद्राला येणाऱ्या मोठ्या भरतीच्या वेळेत पावसाच्या पाण्याचा निचरा जलदगतीने होण्याासाठी नाल्यांच्या आऊटलेटजवळ ईर्ला, वरळी, लव्हग्रोव्ह, ब्रिटानिया, क्लिव्हलँड, गझदरबंध, मोगरा व माहूल या आठ ठिकाणी पंपिंग स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्यापैकी काही पंपिंग स्टेशनची कामे पूर्ण होऊन सुरुही झाले असल्याची माहिती समोर येत आहे, तर उर्वरीत माहूल व मोगरा पंपिंग स्टेशनसाठी भूसंपादनाची प्रक्रिया तसेच पंपिंग उभारणीसाठी निविदा मागविण्याची प्रक्रिया सुरु आहे. यामध्ये भूसंपादनाच्या प्रक्रियांना अडचण येत असल्याचंही समोर येत आहे.

मुंबईच्या सखोल भागात साचणारं पाणी किंवा ताशी 50 मिलिमीटर प्रमाणात पडणाऱ्या पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी पालिकेकडून ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाचं नियोजन आखण्यात आलं होतं.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments