नॅशनल

खार्किवमधून नेरुळच्या मुलीचा व्हिडीओ कॉल आला, पालकांनी श्वास रोखला…

प्रदीप कानडे (48) आणि नेहा कानडे (44) यांची मुलगी दक्षा 3 आठवड्यांपूर्वीच युक्रेनला गेली होती.

Mumbai Student in Ukraine : युक्रेनमधील विविध भागांतील विद्यार्थी भारतात येण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच युक्रेनमधील एका छोट्या शहरात अडकलेल्या 19 वर्षीय वैद्यकीय विद्यार्थ्यीनीचे पालक आपल्या मुलीची वाट पाहत आहेत.

नेरुळच्या प्रदिप कानडेंची मुलगी युक्रेनच्या खारकिवमध्ये अडकली आहे. ज्या खारकिवचा रशियाच्या सैन्याने ताबा घेण्यास सुरुवात केलीये. त्याच खारकिवमध्ये दक्षा कानडे शिकण्यासाठी गेली होती. बंकरमध्ये असलेल्या दक्षाचा अनेकदा प्रदीप यांना व्हिडीओ कॉल येतो आणि त्यातच त्यांचा हुंदका दाटतो.

प्रदीप कानडे (48) आणि नेहा कानडे (44) यांची मुलगी दक्षा 3 आठवड्यांपूर्वीच युक्रेनला गेली होती.

“कोणता दरवाजा ठोठवावा आणि कोणाशी संपर्क साधावा हेच आता तिला कळत नव्हते. दक्षाकडे असलेला अन्नसाठा आता संपला आहे. मदतीसाठी कोणीही समोर येत नाहीये. तिच्या होणाऱ्या अवस्थेमुळे इकडे पालकही झोपत नाहीत.

दक्षा 10 फेब्रुवारी रोजी खारकिव्ह नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी गेली होती. ऑनलाईन क्लासनंतर आताच कुठे ऑफलाईन क्लास सुरु झाले होते. दक्षा ही फक्त रशियाच्या सीमेपासून 42 किमी अंतरावर राहत होती.

“3 दिवसांपूर्वी, भारतीय दूतावासाने विद्यार्थ्यांना खार्किव सोडण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे जे काही असेल ते पासपोर्ट, कागदपत्रे, पैसे, खाण्यापिण्याचं साहित्य घेऊन अनेक विद्यार्थी जवळच्या मेट्रो स्टेशनकडे निघाले. मात्र तिथपर्यंत जाण्यासाठीही या विद्यार्थ्यांकडे कुठलेच वाहन नव्हते.

“तिथे आल्यानंतरही त्यांना ट्रेनमध्ये चढण्यास मिळालं नाही, 6 तास तिथे जेवणाशिवाय वाट पाहिल्यानंतर अचानक गोळीबार आणि बॉम्बस्फोट सुरू झाला. गोळीबारानंतर विद्यार्थ्यांनी स्थानकाच्या इतर भागामध्ये धावाधाव सुरु केली. त्यानंतर दूतावासाशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी तिथून 16 किमी लांब असलेल्या पिसोचिन स्टेशनवर येण्यास सांगितलं.

“पिसोचिनमध्ये त्यांना काही खोल्यांमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती, त्यानंतर दक्षाची कोणतीच अपडेट न आल्याचं दक्षाचे वडील म्हणाले. पोलंड आणि हंगेरी या दोन्ही सीमा पिसोचिनपासून 1000 किमी दूर आहेत, तर रशियन सीमा फक्त 100 किमी दूर आहे. यामुळे दक्षाच्या वडिलांना भिती वाटत आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments