आपलं शहर

Mumbai Water Taxi : मुंबईत वॉटर टॅक्सीचे नवे दर, काय आहेत नक्की जाणून घ्या !

मुंबईत वॉटर टॅक्सी नुकतीच सुरू झाली आहे. 17 फेब्रुवारी 2022ला मुंबई ते नवी मुंबईचा प्रवास कमीतकमी वेळेत, सुलभ करण्यासाठी आणि महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबईत वॉटर टॅक्सी सुरू केली आहे. आता त्या टॅक्सीचा प्रवास स्वस्त होणार आहे.

Mumbai Water Taxi : मुंबईत वॉटर टॅक्सी नुकतीच सुरू झाली आहे. 17 फेब्रुवारी 2022ला मुंबई ते नवी मुंबईचा प्रवास कमीतकमी वेळेत, सुलभ करण्यासाठी आणि महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबईत वॉटर टॅक्सी सुरू केली आहे. आता त्या टॅक्सीचा प्रवास स्वस्त होणार आहे.

आपल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र सरकारने वॉटर टॅक्सींच्या वापराला चालना देण्यासाठी वॉटर टॅक्सीवरील कर तीन वर्षांसाठी माफ केला आहे. यानंतर वॉटर टॅक्सीचे भाडे 10 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. सध्या या वॉटर टॅक्सीला प्रवाशांचा अपेक्षापेक्षाही कमी प्रतिसाद मिळत आहे. तसेच महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांना 3 वर्षांसाठी करात सवलत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

एका वॉटर टॅक्सी चालकाने एका अहवालात सांगितले आहे की, ‘मेरीटाईमला या सेवेसाठी 10% कर भरावा लागतो. पण जर कर कमी झाला तर प्रवासाच्या दरसुद्धा कमी होऊ शकतात.’

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments