Nawab Malik Case : मलिकांचा जामीन कोर्टाने का फेटाळला, कोर्टात काय झालं?
राष्ट्रवादी नेते आणि राज्यमंत्री नवाब मलिक यांना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम सुटका करण्यास नकार दिला. अटक करण्यामागे राजकीय हेतू असून ती बेकायदा ठरवण्याच्या मागणीसाठी मलिक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Nawab Malik Case : राष्ट्रवादी नेते आणि राज्यमंत्री नवाब मलिक यांना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम सुटका करण्यास नकार दिला. अटक करण्यामागे राजकीय हेतू असून ती बेकायदा ठरवण्याच्या मागणीसाठी मलिक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
तसेच ईडीने सूड भावनेने कारवाई केल्याचा युक्तिवाद मलिकांच्या वकिलांनी केला होता. पण मलिकांवर केलेले आरोप गंभीर आहेत. मलिकांच्या वकिलांचा युक्तिवाद कोर्टाने मान्य केला परंतु याचिका फेटाळली आहे. मलिकांचा ईडीवरचा आरोप चुकीचा असल्याचे हायकोर्टाने सांगितले आहे. आधी 3 मार्चपर्यंत विशेष न्यायालयाच्या ईडी कोठडी सुनावण्याच्या आदेशालाही मलिक यांनी आव्हान दिले होते.
1999 मध्ये झालेल्या दाऊद इब्राहिमच्या बहिणीसोबत जमिनीच्या व्यवहारासंदर्भात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)ने मनी लाँड्रिंग आणि “टेरर फंडिंगमध्ये सक्रिय सहभाग” या आरोपाखाली अटक झाली होती. न्यायालयाच्या मताप्रमाणे, नवाब मलिक यांना रितसर जामीनासाठी अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. 15 मार्चपर्यंत मलिक यांना न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली होती.