खूप काहीफेमस

Ola Electric Scooter : Ola इलेक्ट्रिक स्कूटरचा नवीन रंग बाजारात उपलब्ध, जाणून घ्या काय आहेत फीचर्स !

होळीच अवचित साधत ola इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये गेरू रंगाची नवीन स्कूटर बाजारात उपलब्ध करण्यात आली आहे. होळीच्या निमित्ताने गेरू रंग बाजारात olaने आणली आहे. अगदीच उठून दिसणारा हा नवीन रंग लोकांच्या पसंदीला येणार आहे.

Ola Electric Scooter : सणासुदीला लोक नवीन वस्तू विकत घेतात. अगदी त्यांना जमेल तसं कोणी सोन्याचे दागिने विकत घेत, कोणी गाडी, कोणी घरातील वस्तू असे वेगवेगळे वस्तू लोक खरेदी करतात. तेव्हा लोकांची तुफान गर्दी दुकानांमध्ये असते. त्यातच आता होळी आहे.

होळीच अवचित साधत ola इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये गेरू रंगाची नवीन स्कूटर बाजारात उपलब्ध करण्यात आली आहे. होळीच्या निमित्ताने गेरू रंग बाजारात olaने आणली आहे. अगदीच उठून दिसणारा हा नवीन रंग लोकांच्या पसंदीला येणार आहे. ही स्पेशल इलेक्ट्रिक स्कूटर फक्त 17 आणि 18 मार्चला ग्राहक बुक करू शकतात. या स्कूटरची प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे एका चार्जवर 135 किमीची ड्रायव्हिंग रेंज मिळणार आहे. तर याची स्पीड 115 किमी ताशी एवढी असणार आहे.

डिसेंबर 2020मध्ये ola इलेक्ट्रिकने तामिळनाडू सरकारसोबत पहिल्या कारखान्यासाठी 2 हजार 400 कोटींच्या करारावर सही केली. ग्राहकांची मागणी वाढल्यामुळे उत्पादन वाढण्यात आले. Ola S1 Proशिवाय 10 रंगामध्ये स्कूटर उपलब्ध करण्यात आली आहे. खरेदी प्रक्रिया संपूर्णपणे ola ऍपद्वारे होणार आहे. डिस्पॅच एप्रिलपासून सुरू होईल आणि तसेच ग्राहकांच्या दारात वितरित केले जाईल.

याची किंमत 1.29 लाख आहे. 3 सेकंदात 40 किमी प्रतितास वेगाने धावू शकते. 135 किमीची ड्रायव्हिंग रेंज देऊ शकतो, अशी माहिती अधिकृत वेबसाईटवर दिलेली आहे. याचे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि उत्तम डिझाइन आहे. याची बुकिंग फक्त आज आणि उद्याच आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments