आपलं शहरनॅशनल

Petrol New Rates : मुंबईत पेट्रोलचे दर बदलले, दिल्लीपेक्षा मुंबईत पेट्रोल महाग

भारतात रोजच पेट्रोलच्या भावात चढउतार होत असतो. पण गेल्या 4 महिन्यात पेट्रोलच्या भावात काही फारसा बदल झालेला नाही त्याचे कारण म्हणजे रशिया-युक्रेनचे युद्ध. या युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे भाव वाढले आहे.

Petrol New Rates : भारतात रोजच पेट्रोलच्या भावात चढउतार होत असतो. पण गेल्या 4 महिन्यात पेट्रोलच्या भावात काही फारसा बदल झालेला नाही त्याचे कारण म्हणजे रशिया-युक्रेनचे युद्ध. या युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे भाव वाढले आहे.

डिसेंबर 2021 मध्ये दिल्ली सरकारने पेट्रोलवरील कर 30 टक्क्यांवरून 19.40 टक्क्यांवर आणला होता. तसेच आता दिल्लीत पेट्रोलचा दर 95.41 प्रती लीटर तर डिझेलचा दर 86.67 रुपये प्रती लीटर आहे. कोलकत्तामध्ये पेट्रोलचा दर 104.67 प्रती लीटर आहे तर डिझेलचा दर 89.79 प्रती लीटर आहे. तसेच चेन्नईत पेट्रोलचा दर 101.40 प्रती लीटर तर डिझेलचा दर 89.79 प्रती लीटर आहे. आपल्या मुंबईत पेट्रोलचा दर 109.98 प्रती लीटर तर डिझेलचा दर 94.14 प्रती लीटर आहे.

सर्वात जास्त पेट्रोलचा दर मुंबईत आहे. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी किंमत आहे त्याचे कारण म्हणजे त्यावरचा कर. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीतला बदल लक्षात घेऊन इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियमसारख्या सरकारी तेल शुध्दीकरण कंपन्या आपले तेलाचे दर बदलतात. 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments