फेमस

Rail Ticket Reservation : रेल्वेच्या तिकिटांमध्ये मोठे बदल, प्रवास करण्याआधी वाचा IRCTC चा नवा प्लॅन

तिकीट काढण्यासाठी रेल्वे स्टेशनच्या तिकीट काउंटरवर जायचा विचार करत असाल तर तस करू नका. कारण IRCTCने त्याच्या rail connect ॲप बदल सांगितले आहे. या ॲपद्वारे तुम्ही घरबसल्या रेल्वे तिकीट आरक्षण करू शकता. त्यामुळे तुम्हाला रेल्वे स्टेशनच्या तिकीट काउंटरवर लांब रांगेत उभं राहण्याची गरज नाही.

Rail Ticket Reservation : तुम्ही तुमच्या गावाला होळीसाठी, उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी जायचा विचार करत असाल. तिकीट काढण्यासाठी रेल्वे स्टेशनच्या तिकीट काउंटरवर जायचा विचार करत असाल तर तस करू नका. कारण IRCTCने त्याच्या rail connect ॲप बदल सांगितले आहे. या ॲपद्वारे तुम्ही घरबसल्या रेल्वे तिकीट आरक्षण करू शकता.

त्यामुळे तुम्हाला रेल्वे स्टेशनच्या तिकीट काउंटरवर लांब रांगेत उभं राहण्याची गरज नाही.

कस करायचे तिकीट बुक ते बघूयात :
1. पहिले तुम्हाला IRCTC Rail Connect हा ॲप गूगल प्ले स्टोरवरून किंवा iphone प्ले स्टोरवरून मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचा आहे.
2. त्यानंतर तुम्हाला जर तुमचे पहिलेच अकाउंट असेल तर sign in करायचे आहे आणि नवीन युजर असाल तर User Registration वर क्लिक करून तुमची माहिती भरायची आहे.
3. युजर नेम आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवर आणि ई-मेलवर आलेला otp टाका, मग एक 4 अंकी पिन कोड टाका. त्यानंतर लॉग इन होईल
4. एकदा लॉग इन झाल्यावर तुम्हाला डॅशबोर्डचा पेज ओपन होईल.
5. त्यात तुम्ही ‘प्लॅन माय जर्नी’ मध्ये जाऊन तुम्हाला कोणत्या स्टेशनपासून ते कोणत्या स्टेशनपर्यंत जायचे आहे, क्लास, कोटा, प्रवासाची तारीख हे सर्व टाकून ‘सर्च ट्रेन’ वर क्लिक करायचे आहे.
6. त्यानंतर तुमच्या वेळेनुसार आणि तुम्हाला हवीती ट्रेन सिलेक्ट करायची.
7. मग ‘पॅसेंजर डिटेल्स’वर क्लिक करा. मग ‘आय ऍग्री’वर क्लिक करा. जर तुम्हाला त्यात अजून कोणाचे नाव ऍड करायचे असेल तर तुम्ही तेही करू शकता.
8. त्यानंतर तुमचा पत्ता टाकून तुम्ही तुम्हाला हवे ते पायमेंट मोड सिलेक्ट करू शकता.
9. अश्या प्रकारे तुमचे रेल्वे आरक्षण तुम्ही घर बसल्या करू शकता. प्रवासादरम्यान तुम्ही ते तिकीट दाखवू शकता.

या ॲपमुळे प्रवाश्यांचा वेळ वाचणार आहे. त्यांना लांब रांगेत उभे राहण्याची गरज नाही.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments