राज ठाकरे दिसणार नव्या भूमिकेत; आनंदाची बातमी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष कृष्णकुंज या घरातून नवीन शिवतीर्थ या ठिकाणी राहायला गेले. नोव्हेंबर महिन्याच्या सुरवातीला राज ठाकरे या घरी राहायला गेले. या घरी राहायला जाताच राज ठाकरे आता नव्या भूमिकेत दिसणार आहेत.

Raj Thackeray Grand Father : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष कृष्णकुंज या घरातून नवीन शिवतीर्थ या ठिकाणी राहायला गेले. नोव्हेंबर महिन्याच्या सुरवातीला राज ठाकरे या घरी राहायला गेले. या घरी राहायला जाताच राज ठाकरे आता नव्या भूमिकेत दिसणार आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा तरुणांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. कारण या पक्षातील बहुतांश पदाधिकारी हे तरुण आणि पन्नाशीच्या आत मधले आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांना सुद्धा तरुण तडफदार नेतृत्व असे आजपर्यंत लागत आले आहे. पण आता हेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजोबा होणार आहेत.
त्यामुळे शिवतीर्थावर आजोबा म्हणणारे कोणीतरी शिवतिर्थावर दाखल होणार आहे. राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित राज ठाकरे आणि स्नुषा मिताली ठाकरे हे आई-बाबा होणार आहेत.
अमित आणि मिताली यांचा साखरपुडा जानेवारी 2018 ला झाला होता त्यानंतर तब्बल एक वर्षाने म्हणजे 27 जानेवारीला 2019 ला त्यांचे लग्न झाले होते आणि आता तीन वर्षांनी ते आई-बाबा होणार आहे. मिताली यांना गरोदरपणाचे 7 महिने पूर्ण झाले असून एप्रिल महिन्यात हा नवीन पाहुणा घरी येणार आहे.