आपलं शहरबीएमसी

Restrictions On Holi Celebration : होळी आणि धुळवड साजरी करताहेत, त्यापूर्वी ही नियमावली वाचा !

मागील 2 वर्षात कडक नियम असल्यामुळे मुंबईकरांनी धुळवड साजरी केली नव्हती. पण आता मुंबईकर धुळवड मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचे चिन्ह दिसत आहेत. पण त्याआधीच राज्य सरकारने होळी आणि धुळवडीसाठी नियमावली जाहीर केली आहे. नागरिकांना ते नियम पाळवेच लागणार आहेत.

Restrictions On Holi Celebration : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे त्यामुळे अनेक नियम शिथिल झाले आहेत. त्यातच आता होळी आणि धुलीवंदन जवळ येत आहे. मागील 2 वर्षात कडक नियम असल्यामुळे मुंबईकरांनी धुळवड साजरी केली नव्हती. पण आता मुंबईकर धुळवड मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचे चिन्ह दिसत आहेत.

उद्याच म्हणजेच 17 मार्चला होळी आणि 18 मार्चला धुळवड आहे त्यामुळे नागरिक उत्साहात आहेत. पण त्याआधीच राज्य सरकारने होळी आणि धुळवडीसाठी नियमावली जाहीर केली आहे. नागरिकांना ते नियम पाळवेच लागणार आहेत. सध्या बारावीची परीक्षा सुरू आहे त्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा विचार करत ही नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार, डीजे लावण्यावर बंदी आहे तसेच धुळवड साजरी करताना मद्यपानसुद्धा करण्यास बंदी आहे.

मुंबईसह अनेक शहरीभागात धुळवड साजरी करताना रंगाच्या पाण्याचे छोट्या पिशव्या किंवा फुगे फेकून मारतात त्यामुळे आतापर्यंत अनेक दुर्घटना झाल्या आहेत. म्हणून या पिशव्या आणि फुग्यांवरसुद्धा दरवर्षीप्रमाणे आता बंदी घालण्यात आली आहे. तसेच रात्री 10 नंतर होळी साजरी करण्यास बंदी केली आहे त्यामुळे रात्री 10 नंतर होळी साजरी केल्यास तो शिक्षेस पात्र राहील. कोणत्याही जाती-धर्माच्या भावना दुखावल्या जातील अशा घोषणा करू नयेत. तसेच लाऊडस्पीकर मोठ्या आवाजात लावू नये असा देखील नियम आहे. त्यामुळे होळी साजरी करताना आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी नागरिकांनी घ्यायची आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments