Road Construction : महापे-शिळफाटा मार्गावरील वाहतूककोंडी वाढण्याची शक्यता
4 मार्चपासून पुढील 15 दिवस महापे-शिळफाटा मार्गावरील महाराष्ट्र औदयोगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे महापे-शिळफाटा मार्गावरील वाहतूककोंडी वाढण्याची शक्यता आहे.

Road Construction : 4 मार्चपासून पुढील 15 दिवस महापे-शिळफाटा मार्गावरील महाराष्ट्र औदयोगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे महापे-शिळफाटा मार्गावरील वाहतूककोंडी वाढण्याची शक्यता आहे.
महापे-शिळफाटा मार्गावरील एमआयडीसी रस्त्यावरून नवी मुंबई, महापेच्या दिशेने कल्याण-डोंबिवली, अंबरनाथकडून हजारो वाहने रोज जातात. या मार्गावर अनेक खड्डे निर्माण झाल्यामुळे या रस्त्याचे काम करायचा निर्णय एमआयडीसीने घेतला आहे. त्यामुळे हा एमआयडीसीचा रस्ता 4 मार्चपासून पुढील 15 दिवसांसाठी बंद असण्याचा निर्णय वाहतूक शाखेने घेतला आहे. ही वाहतूक कल्याण- शिळफाटा या पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.
कल्याण, पनवेल येथील कल्याणफाटा – फॉरेस्ट नाका येथे वाहनांना बंदी करण्यात आली आहे. तसेच ही वाहने कल्याणफाटा इथून उजवीकडे वळण घेऊन शिळफाटामार्गे किंवा पनवेलकडून येणारी वाहने कल्याणफाटा इथून सरळ जाऊन शिळफाटामार्गे इच्छित ठिकाणी जातील. तसेच महापे-नवी मुंबई इथून हॉटेल पूजा-पंजाबकडून कल्याणला जाणाऱ्या सर्व वाहनांना हॉटेल पूजा-पंजाब येथे प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. येथील वाहने शिळ फाटा इथून उजवीकडे वळण घेऊन कल्याणफाट्यामार्गे जातील.