स्पोर्ट

Video : मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माचं वेलकम; खास व्हिडीओ केला शेअर

Rohit Sharma in Mi Team : मुंबई इंडियन्सचा कोच महेला जयवर्धनेने कर्णधार रोहित शर्माचे टीममध्ये स्वागत केले आहे. आपले दौरे संपवून रोहित IPL 2022 च्या आधी आपल्या टीममध्ये सामील झालेला आहे.

Rohit Sharma in Mi Team : कसोटी मालिकेत 2-0 ने श्रीलंकेवर विजय मिळवल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा 2022 च्या इंडियन प्रीमियर लीग (IPL – Indian Premier League) हंगामाच्या आधी मुंबई इंडियन्सच्या (MI) संघात आला आहे. मुंबई इंडियन्सने रोहितच्या टीममध्ये जॉईन होतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये MI चा मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने आणि सपोर्ट स्टाफच्या इतर सदस्यांनी त्याचे स्वागत केले आहे.

हा व्हिडिओ मुंबई इंडियन्स (MI) फ्रँचायझीच्या अधिकृत हँडलने एका टायटलसह पोस्ट केला आहे.

MI त्यांचा पहिला सामना 27 मार्च रोजी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्ध खेळणार आहे. एमआयने आत्तापर्यंत पाच आयपीएल विजेतेपदे जिंकली आहेत, तर एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसकेने चार विजेतेपद पटकावले आहेत. अलीकडेच आयपीएल मेगा लिलावात, एमआयने यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यांच्यावर मोठी रक्कम लावली होती.

संपूर्ण मुंबई इंडियन्स संघ :

रोहित शर्मा, इशान किशन, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, किरॉन पोलार्ड, डेवाल्ड ब्रेविस, मुरुगन अश्विन, बेसिल थम्पी, टिळक वर्मा, संजय यादव, डॅनियल सॅम्स, जोफ्रा आर्चर, टायमल मिल्स, टीम डेव्हिड, रिले मेरेडिथ, अर्शद खान, अनमोलप्रीत सिंग, रमणदीप सिंग, राहुल बुद्धी, हृतिक शोकीन, अर्जुन तेंडुलकर, आर्यन जुयाल, फॅबियन अॅलन,

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments