स्पोर्ट

Sachin-Warne 1998 Match : 1998 मधील त्या क्रिकेट सामन्याची अजूनही लोक का आठवण काढतात ?

क्रिकेट म्हणजेच भारतीय लोकांचा आवडता खेळ. क्रिकेटप्रेमींना तुम्ही विचारलं की भारतासोबत तुम्हाला कोणत्या देशाचा सामना आवडतो ? तर सर्वांचे उत्तर सर्वात पहिला पाकिस्तान येईल मग दुसरे उत्तर ऑस्ट्रेलिया येईल. सर्व क्रिकेटप्रेमींना माहिती आहे की भारत आणि ऑस्ट्रेलियाचा सामना खूप रोमांचक आणि टक्कर देणारा असतो.

Sachin-Warne 1998 Match : क्रिकेट म्हणजेच भारतीय लोकांचा आवडता खेळ. क्रिकेटप्रेमींना तुम्ही विचारलं की भारतासोबत तुम्हाला कोणत्या देशाचा सामना आवडतो ? तर सर्वांचे उत्तर सर्वात पहिला पाकिस्तान येईल मग दुसरे उत्तर ऑस्ट्रेलिया येईल. सर्व क्रिकेटप्रेमींना माहिती आहे की भारत आणि ऑस्ट्रेलियाचा सामना खूप रोमांचक आणि टक्कर देणारा असतो.

आपण जर बघितलं तर या 2 टीमचे वनडे मॅच सोबत टी20 चे सुद्धा मॅच रोमांचक आणि बघण्यासारखे असतात. टेस्ट मॅच सुद्धा खूप रोमांचक असतात. या सर्व मॅचमधून 1998 मधली मॅच सर्वांना लक्षात राहण्यासारखी आहे.

1998 मध्ये चेन्नईतील चिदंबरम स्टेडियममध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सिरीज मॅच सुरू होत्या. सचिन आणि वॉर्नमध्ये असलेली मॅच नेहमीच रोमांचक असायची. त्यावेळेस सचिन सर्वात चांगला फलंदाज होता, तसेच वॉर्न त्यावेळेसचा स्पिनचा क्रिकेटमधील राजा होता. 9 मार्च रोजी झालेल्या या मॅचचे कौतुक सर्वत्र झालेच पण दरवर्षी 9 मार्चला या मॅचची आणि सचिन-वॉर्नच्या सामन्याची आठवण सर्वांना येतेच. याच दिवशी सचिनने 155 धावा केल्या होत्या. 6 मार्च 1998 रोजी ही मॅच सुरू झाली होती. तेव्हा लोक या मॅचपेक्षा जास्त सचिन आणि वॉर्नच्या सामन्यासाठी उत्सुक होते. पहिले भारताने फलंदाजी घेतली होती पण वॉर्नने सचिनला 4 धावातच बाद केले. तेव्हा भारताने कसेतरी 257 धावा केल्या आणि वॉर्नने 4 विकेट घेतले. ऑस्ट्रेलियाची फलंदाजी असताना 328 धावा केल्या.

दुसऱ्या डावात भारतीय संघ फलंदाजीला येण्याआधीच हा संघ फार काळ टिकणार नाही, असे लोकांना वाटत होते. हा सामना भारताच्या हाताबाहेर गेल्याचे लोकांना वाटत होते. तिसर्‍या-चौथ्या दिवशी खेळपट्टी बिघडली होती म्हणून असा विचार करणे योग्यच होते. त्या खेळपट्टीवर शेन वॉर्न चमत्कार करू शकला असता. पण सचिनने असे होऊ दिले नाही. तो मैदानात उतरला आणि भारताने सांभाळून फलंदाजी केली. यावेळेस सचिनने 191 चेंडूत 155 धावा करत शेन वॉर्नला संधी दिली नाही. यात 14 चौकार आणि 4 षटकार केले. यात भारताने 418 धावा केल्या. आणि भारताने हा सामना 179 धावांनी जिंकला. सचिनची ही एक खेळी आजही स्मरणात आहे कारण ती कठीण काळात खेळली गेली होती. यानंतर बराच काळ जगाने शेन वॉर्न आणि सचिन तेंडुलकर यांच्यातील टक्कर पाहिली.

4 मार्च 2022ला शेन वॉर्नचे वयाच्या 52व्या वर्षी निधन झाले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments