फेमस

पती 3 दिवस उपाशी, स्वत: संयोगिताराजेंनी उचललं होतं मोठं पाऊल…

महाराष्ट्र सरकारने 28 फेब्रुवारी रोजी संभाजीराजे छत्रपतींची आझाद मैदानात भेट घेऊन सर्व मागण्या मान्य केल्या.

Sambhaji Raje Hunger Strike : संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजाच्या काही मागण्यांसाठी बेमुदत उपोषण धरलं होतं. शनिवारी 26 फेब्रुवारी रोजी त्यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात केली होती. अखेर महाराष्ट्र सरकारने 28 फेब्रुवारी रोजी संभाजीराजे छत्रपतींची आझाद मैदानात भेट घेऊन सर्व मागण्या मान्य केल्या आणि संभाजीराजेंना उपोषण मागे घेण्यास आवाहन केलं. त्यावेळेस संभाजीराजेंनी आपलं उपोषण मागे घेतलं.

या सगळ्यात संभाजीराजेंसोबत त्याचं स्वत:चं माणुसही सोबत होतं. ते म्हणजे त्यांच्या पत्नी संयोगिताराजे. या उपोषणादरम्यान फक्त संभाजीराजे अमरण उपोषणाला बसले नव्हते. तर त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी संयोगिताराजेंनीही खानं-पिणं सोडून दिलं होतं. असं असतानाही त्या त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत आणि आपले पती संभाजीराजेंसोबत अॅक्टिव्ह होत्या.

संभाजीराजेंची मैदानामध्ये काळजी घेण्यापासून ते आंदोलनामध्ये कार्यकर्त्यांचे व्यवस्था करण्यापर्यंत संयोगिताराजे सगळ्याय गोष्टी पाहत होत्या. त्यांच्यासोबत शहाजीराजेंनीदेखील अन्नत्याग केला होता. मात्र ही गोष्ट संभाजीराजेंपासून लपून राहिली.

संयोगिताराजेंनी अन्न त्याग केल्याची गोष्ट संभाजीराजेंना उपोषणाच्या शेवटच्या वेळेस समजली. मात्र या काळात संभाजीराजे ज्या ज्या वेळेस विचारपूस करायचे, त्या त्या वेळेस संयोगिताराजे खोटं बोलायच्या. मात्र मी खोटं बोलल्याचंही त्यांनी tv9 marathi शी बोलताना मान्य केलं.

आपला पती जेव्हा उपाशी असतो तेव्हा पत्नीच्या गळ्यातूनही घास जात नाही, इथेतर छत्रपतींच्या वशांचा विषय आहे. ज्या ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज मोहिमेला जात होते त्यावेळी त्यांच्या पत्नीही मोहिमेची चांगली खबर मिळेपर्यंत अस्वस्थ राहायच्या. तिकडे माँसाहेब जिजाऊही मोहिमेची खडांखडा माहिती घ्यायच्या आणि प्रचिती तब्बल चारशे वर्षांनंतरही छत्रपती घराण्यात दिसून आली.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments