नॉलेज

ठाकरे सरकारविरुद्ध असलेले पांडे आता मुंबईचे CP कसे झाले?

महाराष्ट्राच्या पोलीस दलातील 2 नंबरचे पद माणल्या जाणाऱ्या मुंबई पोलीस आयुक्त पदावर संजय पांडे यांची झाली आहे.

Sanjay Pandey History : महाराष्ट्राच्या पोलीस दलातील 2 नंबरचे पद माणल्या जाणाऱ्या मुंबई पोलीस आयुक्त पदावर संजय पांडे यांची झाली आहे. मात्र हे तेच संजय पांडे आहेत, ज्यांनी 2021 च्या काळात ठाकरे सरकारवर मोठे आरोप केले होते. असं असतानाही सरकारने 2021 मध्ये पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार देऊ केला होता.

पांडेंना पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यामागचं कारण होतं ते म्हणजे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची चौकशी करण्यासाठी. परमबीर सिंग आणि संजय पांडे हे एकमेकांच्या विरोधात होते. त्यामुळे सिंगांची चौकशी करण्यासाठीच पांडेंकडे महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. त्याचवेळी हेमंत नगराळे हे मुंबईचे पोलीस आयुक्त झाले होते.

हे तेच संजय पांडे आहेत, जे ठाकरे सरकार विरोधात हायकोर्टात गेले होते. हे प्रकरण बोर्डाकडे गेले, पण याच दरम्यान सरकार आणि पांडे यांच्यातील वाद मिटल्याचे बोलले जाते. याच वेळेस पांडेंना महाराष्ट्र सुरक्षा दलात पाठवण्यात आलं होतं. हाच राग मनात ठेऊन पांडे हायकोर्टात गेले होते, असं म्हटलं जातय. जेव्हा त्यांची महाराष्ट्र सुरक्षा दलात बदली झाली होती. त्यावेळी पांडेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली होती. सोबतच ते पदभार स्विकारण्याआधी 20 दिवसांच्या रजेवर गेले होते.

संपूर्ण कार्यकाळ :

संजय पांडेंनी IIT कानपूरमधून आयटी कॉम्प्युटरमध्ये इंजिनीअरिंग केले
1986 च्या बॅचचे IPS झाले.
पहिला एसीपी पुणे शहरात कार्यरत झाले.
मुंबईत डीसीपी दर्जाचे अधिकारी झाले.
1992 च्या मुंबई दंगली दरम्यान, धारावीमध्ये दंगल नियंत्रण केल्यामुळे श्रीकृष्ण आयोगाकडून कौतुक
मुंबईतील 4 हायप्रोफाईल पोलिस ठाण्यांचे विलीनीकरण करून झोन 8 तयार करण्यात सहभाग.
1995 मध्ये अंमली पदार्थ विभागाचे डीसीपी म्हणून शहरातील ड्रग्ज रॅकेटवर शिक्कामोर्तब केले.
1997 मध्ये आर्थिक गुन्हे शाखेत असताना अभ्युदय बँक घोटाळा, चामडे घोटाळ्याची चौकशी करून भ्रष्टाचाराचे प्रकार उघडकीस आणले.
1999 मध्ये एसपीजी सेक्युरिटीच्या माध्यमातून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या संरक्षणात तैनात होते.
2001 मध्ये IPS चा राजीनामा दिला; पण राजीनामा स्वीकारला गेला नाही. प्रकरण न्यायालयात गेले. 2005 साली पुन्हा सेवेत आले आणि 20 वर्षांची IPS सेवा पूर्ण करून VRS घ्यायचे ठरवले. पण तो मिळाला नाही.
2015 मध्ये ते होमगार्डचे एडीजी झाले, त्याच पदावर असताना डीजी झाले.
अँटिलिया प्रकरणानंतर संजय पांडेंना महाराष्ट्र राज्य सुरक्षा परिषदेत पाठवण्यात आले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments