राजकारण

Sanjay Raut Press : संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेआधी भाजप थेट सवाल

आज म्हणजेच 8 मार्चला संध्याकाळी 4 वाजता पुन्हा संजय राऊत पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यांनी 19 फेब्रुवारीच्या पत्रकार परिषदेत अनेक लोकांची नावे घेऊन मोठा गौप्यस्फोट केला होता. मोहित कंबोज यांनी आज ट्विट करून संजय राऊतांना डिवचले आहे.

Sanjay Raut Press : 19 फेब्रुवारी 2022ला संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली होती. आज म्हणजेच 8 मार्चला संध्याकाळी 4 वाजता पुन्हा संजय राऊत पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यांनी 19 फेब्रुवारीच्या पत्रकार परिषदेत अनेक लोकांची नावे घेऊन मोठा गौप्यस्फोट केला होता. आता आज ते नक्की काय बोलणार आहेत आणि कोणता गौप्यस्फोट करणार यावर सर्वांचे लक्ष आहे.

मोहित कंबोज यांनी आज ट्विट करून संजय राऊतांना डिवचले आहे. कंबोज यांनी राऊतांना तुमचा आणि प्रवीण राऊत यांचा संबंध काय? ज्यांचे स्वतःचेच खाते बिघडले आहे ते दुसऱ्यांच्या खात्यांचे हिशोब घेत काय फिरत आहेत? वसई-विरारपासून ते कुलाबापर्यंत विनावी मालमत्ता नक्की कोणाची? संजय आणि प्रवीण राऊत यांनी लोकांना लुबाडून, भ्रष्टाचार करून कसे विनावी केली ? सलीम जावेदची स्टोरी बंद करा, जर तुमच्या स्वतःवर तलवार लटकत आहे तर दुसऱ्यांवर आरोप करून विषय भटकवण्याचे काम बंद करा. तसेच 10 मार्चला उत्तरप्रदेश, बिहारपासून ते गोवापर्यंत 2024पर्यंत शिवसेनेच्या किती उमेदवारांची जामीन वाचेल ? यावर तुम्ही पूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला सांगा.

असे अनेक प्रश्न विचारून कंबोज यांनी राऊतांना डिवचले आहे. आता संजय राऊत यावर नक्की काय पलटवार करणार हे लवकरच कळेल.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments