राजकारण

Shivsena VS BJP : शिवसेनेच्या निषेधार्थ भाजपा नगरसेवकांची आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने

मुंबई महापालिका स्थायी समितीत शेवटच्या सभेत शिवसेनेने 6 हजार कोटींचे 370 प्रस्ताव कोणत्याही चर्चेविना, विरोधकांना बोलू न देता मंजूर केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणा देत आयुक्तांच्या कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली.

Shivsena VS BJP : मुंबई महापालिका स्थायी समितीत शेवटच्या सभेत शिवसेनेने 6 हजार कोटींचे 370 प्रस्ताव कोणत्याही चर्चेविना, विरोधकांना बोलू न देता मंजूर केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी ‘जागो आयुक्त प्यारे’, ‘भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करा’, ‘भ्रष्टाचाराला आळा घाला’, ‘करदात्या मुंबईकरांच्या पैश्याची उधळपट्टी थांबवा’, ‘मुंबईकरांना सुसह्य जीवन द्या’, ‘यशवंत जाधवांवर कारवाई करा’ अश्या जोरदार घोषणा देत आयुक्तांच्या कार्यालयासमोर भाजपने तीव्र निदर्शने केली.

स्थायी समितीत आलेल्या प्रस्तावात अनेक त्रुटी होत्या. त्यात स्पष्टता नव्हती. याबाबत कुठलीही चर्चा करण्यास अध्यक्षांनी परवानगी दिली नाही. काही प्रस्ताव आदल्या रात्री आले होते. त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होणार आहे. त्यामुळे असे प्रस्ताव मंजूर न करता आयुक्तांनी एक जबाबदार प्रशासक म्हणून पालिकेतील भ्रष्टाचाचाराला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलावीत अशी आग्रही मागणी भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्व नगरसेवकांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली.

गेली तीस वर्षे मुंबईकरांना खोटी आश्वासने देऊन फसवणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेला आगामी निवडणुकीत जनताच धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा देत भाजपा गटनेते शिंदे यांनी दंड थोपटून शिवसेनेला आव्हान दिले आहे.

महापालिकेत प्रशासक म्हणून आयुक्तांची मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्षांनी केलेल्या भ्रष्टाचाराची सखोल तपासणी करून या भ्रष्टाचाराला आळा, पायबंद घालण्यासाठी आणि सामान्य करदात्या मुंबईकरांना न्याय देण्यासाठी भ्रष्टाचारी स्थायी समिती अध्यक्षांवर कठोर कारवाई करावी अशी आग्रही मागणी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी आयुक्तांकडे केली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments