Silver Medal In Weightlifting : 44 वजनी किलो गट आणि रिक्षाचालकाच्या मुलीची सुवर्ण कामगिरी
साताऱ्यातील अस्मिताने आपले नाव राष्ट्रीय स्तरावर नेले आहे. ओडिसामधील भुवनेश्वर येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत कराड मधील मुलीला रौप्यपदक मिळालेले आहे. साताऱ्यातील कराड तालुक्यातील ओघलेवाडी येथील अस्मिता दत्तात्रय ढोणे हिला हे पदक मिळाले आहे.

Silver Medal In Weightlifting : साताऱ्यातील अस्मिताने आपले नाव राष्ट्रीय स्तरावर नेले आहे. ओडिसामधील भुवनेश्वर येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत कराड मधील मुलीला रौप्यपदक मिळालेले आहे. साताऱ्यातील कराड तालुक्यातील ओघलेवाडी येथील अस्मिता दत्तात्रय ढोणे हिला हे पदक मिळाले आहे. अस्मिता ढोणे इयत्ता नववीत शिकत आहे. 44 किलो वजनी गटात अस्मिताला रौप्यपदक मिळालेले असून अस्मिता ही आत्माराम शाळेत शिकते.
या स्पर्धेत तिने द्वितीय क्रमांक पटकावून रौप्यपदक मिळवले आहे. तिचे वडील रिक्षाचालक असून घरची परिस्थिती साधारण आहे. या परिस्थितीत देखील तिच्या पालकांनी तिला प्रोत्साहन देत या यशापर्यंत पोचवले आहे. नववीत शिकणारी अस्मिता हिला तिच्या पालकांसोबत आत्माराम विद्यामंदिर ओघलेवाडी शाळेतील मुख्याध्यापिका प्रतिभा तारून, क्रीडाशिक्षक चंद्रकांत काळे, प्रदीप बडगर, संतोष कुमार आणि कोच सम्राट पवार यांचे मार्गदर्शन तिला लाभले. तसेच यामुळे तिच्यासोबत शाळेचे देखील नाव लौकिक होत आहे.
तिला मिळालेल्या या यशामुळे तिच्यासोबतच शाळेला आणि संपूर्ण साताऱ्याला आनंद झाला आहे. साताऱ्यातील एका मुलीने राष्ट्रीय पातळीवर स्वतःचे नाव कोरले आहे. तिच्यावर सर्व क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.