आंतरराष्ट्रीयघटनाफेमस

Indians In Ukraine : युद्धाचा सातवा दिवस, भारतीयांची युक्रेनमध्ये काय परिस्थिती?

रशिया आणि युक्रेनच्या युद्धात अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी जातात. त्यातील बरेच विद्यार्थी हे खारकीव्ह शहरात अडकले आहेत.

Indians In Ukraine : रशिया आणि युक्रेनच्या युद्धात अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी जातात. त्यातील बरेच विद्यार्थी हे खारकीव्ह शहरात अडकले आहेत.

गेल्या सात दिवसांपासून रशिया – युक्रेनमध्ये चालेल्या युद्धामुळे तिथले जनजीवन संपूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्यामुळे अन्नपाण्याची गैरसोय होत आहे. तिथे फक्त भारतीयच नाही तर अनेक वेगवेगळ्या देशातून विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी येतात. खारकीव्ह येथील विद्यार्थ्यांना तुकड्या तुकड्यांनी शहराबाहेर हलवले जात असतानाच मंगळवारी झालेल्या गोळीबारात कोलकत्ता येथील एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे सर्वच विद्यार्थी दहशतीच्या सावटाखाली आहेत तसेच सर्वच विद्यार्थी घाबरले आहेत.

परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला म्हणाले की, जेव्हा आम्ही आमची पहिली ॲडव्हायझरी जारी केली होती, त्यावेळी युक्रेनमध्ये अंदाजे 20,000 भारतीय विद्यार्थी होते. त्यानंतर सुमारे 12,000 लोकांनी युक्रेन सोडले आहे, जे युक्रेनमधील भारतीय नागरिकांच्या एकूण संख्येच्या 60% आहे. उर्वरित 40% पैकी, सुमारे निम्मे लोक खार्किव, सुमी प्रदेशातील संघर्ष झोनमध्ये राहत आहेत आणि उर्वरित अर्धे एकतर युक्रेनच्या पश्चिम सीमेवर पोहोचले आहेत किंवा ते युक्रेनच्या पश्चिम भागात जात आहेत. ते सामान्यतः संघर्ष क्षेत्राबाहेर आहेत. तसेच आता खारकीव्हमध्ये सध्या एकही भारतीय विद्यार्थी नाही. सर्व भारतीयांना खारकीव्हमधून बाहेर काढण्यात आले आहे.

येणाऱ्या 3 दिवसात भारतीयांना परत आणण्यासाठी सुमारे 26 उड्डाणे निश्चित करण्यात आली आहेत. तसेच सुमारे 12 हजार भारतीय विविध मार्गांनी मायदेशी परत येणार आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments