राजकारण

Prasad Lad Jacket : प्रसाद लाडांच्या जॅकेटने केला कहर, थेट विधान परिषदेत निघाला मुद्दा…

अधिवेशनात अनेक किस्से रंगले. अनेकांवर आरोप प्रत्यारोप झाले. मात्र शेवट गोड व्हावा तसंच काही या अधिवेशनात पाहायला मिळालं.

Prasad Lad Jacket : महाराष्ट्रात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. 25 मार्च रोजी त्याचा शेवट आहे. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर सर्वात जास्त काळ चालणारं अधिवेशन म्हणून या अधिवेशनाकडे पाहिलं जातं. या अधिवेशनात अनेक किस्से रंगले. अनेकांवर आरोप प्रत्यारोप झाले. मात्र शेवट गोड व्हावा तसंच काही या अधिवेशनात पाहायला मिळालं.

विधान परिषदेवर निवडून गेलेल्या 10 आमदारांचा कार्यकाळ संपत आहे. सेनेचे आमदार रवींद्र फाटकांची मुदत 8 जून 2022 रोजी संपणार आहे, तर इतर 9 आमदारांचा कार्यकाळ येत्या 7 जुलै 2022 रोजी संपणार आहे. त्याआधी त्यांचं हे शेवटचं अधिवेशन असणार आहे. म्हणून अधिवेशनाच्या अखेरीस यांना निरोप देण्यात आला.

कार्यकाळ संपत आलेल्या आमदारांना निरोप देताना अनेक आमदार, मंत्र्यांनी भावनिक भाषणं केली. त्यामध्ये भाषण गाजलं ते म्हणजे शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचं. अनिल परब यांनी प्रसाद लाड यांच्या जॅकेटवरून धम्माल भाषण केलं. या भाषणात त्यांनी काय म्हटलंय, ते पाहा.

प्रसाद लाड आणि रविंद्र फाटक ये सभागृहाचे स्टाईन आयकॉन आहेत. हे दोघे ज्यावेळेला गेटमधून आतमध्ये येतात, त्यावेळेला सगळ्या कॅमेऱ्यांची नजर त्यांच्यावर असते. यांची स्टाईल सॉलिड आहे. प्रसाद लाड यांचे सगळ्यांशी चांगले संबंध आहेत. प्रत्येकाशी मैत्रीचे संबंध. एवढ्या कमी वयात, एवढ यश हे सर्वसाधारण कोणालाही मिळत नाही. त्याच्यासाठी वेगळे गूण असावे लागतात, जे सगळे गूण लाड यांच्यात आहेत.

अनिल परब पुढे म्हणतात की, प्रसाद लाड यांचे जॅकेट्स बघण्यामध्ये मला फार इंटरेस्ट असतो. मी कधी कधी मोजत असतो की या अधिवेशनात प्रसाद लाड यांनी किती जॅकेट्स घातले. कधी कधी सकाळी वेगळं, दुपारी वेगळं, संध्याकाळी वेगळं जॅकेट्स त्यांच्या अंगावर असतं. आम्हाला कोणी फुकट जरी आणून दिलं, तरी आम्हाला हे जमेल असं काही वाटत नाही. असं मत अनिल परब यांनी विधान परिषदेत भाषण करताना मांडलं आहे.

कोणत्या आमदारांचा कार्यकाळ संपला

भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या 3 पक्षांच्या 10 विधानपरिषदेतील आमदारांचा कार्यकाळ संपला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, संजय दौंड, भाजपचे आमदार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजपपुरस्कृत आमदार सदाभाऊ खोत, सुजितसिंग ठाकूर, विनायक मेटे, प्रसाद लाड, शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक, उद्योगमंत्री सुभाष देसाई, दिवाकर रावते या आमदारांचा कार्यकाळ संपला आहे. (Which MLA’s term ended)

पाहा व्हिडीओ :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments