हेल्थ

3000 ऑपरेशन्स थांबले, डॉक्टरांच्या ‘या’ संपामुळे हजारो विद्यार्थ्यांचं नुकसान?

मध्य महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघाकडून सांगण्यात येत आहे की व्हर्च्युअल बैठकीतून यावर तोडगा काढला जाईल.

Strike of Doctors : गेल्या दोन दिवसांपासून वैद्यकीय शिक्षक आणि डॉक्टरांच्या संपामुळे, मंगळवारी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 3,000 हून अधिक शस्त्रक्रिया होऊ शकल्या नाहीत.

फ्री प्रेसने दिलेल्या माहितीनुसार सुमारे 2,700 शिक्षकांनी क्लिनिकल कामातून माघार घेतली आहे. गेल्या 49 दिवसांपासून सुरु असलेल्या धरणे आंदोलन आणि उपोषणातून वैद्यकीय शिक्षक आणि डॉक्टरांनी आंदोलनातील पुढील पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. डॉक्टरांनी सोमवारी (14 march) प्रथमच रुग्ण सेवेवर बहिष्कार टाकला आहे.

मध्य महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघाकडून (The Central Maharashtra State Medical Teachers Association – MSMTA) सांगण्यात येत आहे की व्हर्च्युअल बैठकीतून यावर तोडगा काढला जाईल.

आंदोलनाच्या दरम्यान डॉक्टरांनी जरी ओपीडी, वॉर्ड भेटी, प्रयोगशाळेंची तपासणी, रेडिओलॉजिकल तपासणी, काही शस्त्रक्रिया जरी बंद केल्या असल्या तरी मात्र आपत्कालीन सेवा सुरु असल्याचं एमएसएमटीएचे डॉ. सचिन मुलकुटकर यांनी म्हटलं आहे.

आंदोसनासाठी मागण्या काय?

  • 7 व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी
  • थकबाकीचा भरणा
  • अलिबाग, सातारा आणि नंदुरबार येथील नवीन महाविद्यालयातील बदल्या थांबवणे
  • अनेक शिक्षकांना शिक्षकाचा दर्जा न मिळणे
  • इत्यादी

आंदोलनामुळे नुकसान काय?

  • सोमवारपासून (14 march) ओपीडी, शस्त्रक्रिया, रेडिओलॉजिकल तपासणी बंद
  • शिक्षकांचा परीक्षा घेण्यास नकार दिला
  • एक महिन्याहून अधिकवेळ एमबीबीएस आणि पीजी वर्ग बंद
  • विद्यार्थ्यांच्या प्रोजेक्ट्सवर स्वाक्षरी नाहीत, ज्यामुळे अनेक विद्यार्थी ‘मे’मध्ये परीक्षेसाठी उपस्थित राहू शकत नाहीत.

हेही वाचाच…

मुंबईत १२ वर्ष पूर्ण ते १४ वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण, या लसीकरण केंद्रावर मिळेल लस

मुंबईकर होणार अजून हॉट, 1956 चा परिणाम दिसणार 2022 मध्ये

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments