खूप काहीनॉलेज

Upcoming IPO : LIC च्या आधी या IPO ने मारली बाजी, पाहा कसं असेल IPO चं मॅनेजमेंट

कोलकातामधील उमा एक्सपोर्ट्स IPO ची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) 28 मार्च ते 30 मार्च 2022 दरम्यान सदस्यता घेतली जाऊ शकते. 7 एप्रिल 2022ला कंपनीचे शेअर्स शेअर बाजारात सूचीबद्ध केले जाऊ शकतात. 

Upcoming IPO : कोलकातामधील उमा एक्सपोर्ट्स IPO ची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) 28 मार्च ते 30 मार्च 2022 दरम्यान सदस्यता घेतली जाऊ शकते. 7 एप्रिल 2022ला कंपनीचे शेअर्स शेअर बाजारात सूचीबद्ध केले जाऊ शकतात.

रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे देशातील सर्वात मोठी कंपनी LIC चे IPO देखील अजून आले नाही आहे. पण त्याच दरम्यान, मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कृषी उत्पादने आणि वस्तूंच्या व्यापार आणि विपणनाशी संबंधित असलेल्या कंपनीचा IPO येणार आहे. जर तुम्ही IPO द्वारे पैसे कमवण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी ठरू शकते.

या आगामी IPO बद्दल जाणून घेऊयात :

कोलकातामधील Uma Exports Ltd ची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) 28 मार्च रोजी सदस्यत्वासाठी उघडेल. गुंतवणूकदार 30 मार्चपर्यंत या IPO चे सदस्यत्व घेऊ शकतील.

Uma Exports IPO वाटप आणि सूचीची तारीख :

कंपनीच्या समभागांचे वाटप (Uma Exports IPO वाटप) 4 एप्रिलपर्यंत पूर्ण केले जाऊ शकते. ब्रोकरेज हाऊसच्या म्हणण्यानुसार, कंपनीचे शेअर्स 7 एप्रिल 2022ला बाजारात लिस्ट केले जाऊ शकतात. उमा एक्सपोर्ट्सने सप्टेंबर 2021मध्ये IPO साठी DRHP दाखल केला होता. या IPO च्या माध्यमातून कंपनी तब्बल 60 कोटी रुपये उभारणार आहे. यापैकी 50 कोटी भांडवली गरजांसाठी खर्च केले जातील.

उमा एक्सपोर्ट्सच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, कंपनीमध्ये साखर, लाल मिरची, हळद, धणे, जिरे  यांसारख्या मसाल्यांचा समावेश आहे. तसेच तांदूळ, गहू, मका, कडधान्ये, चहाची पाने आणि सोयाबीन यांचा देखील समावेश आहे. म्हणजेच शेती उत्पादने आणि वस्तूंच्या व्यापार आणि विपणनाच्या कामात गुंतलेली आहे.

ही कंपनी कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि म्यानमारमधून डाळी, काळी उडीद डाळ आणि तूर डाळ आयात करते. त्याच वेळी चीन श्रीलंका, यूएई आणि अफगाणिस्तानला साखर आणि बांगलादेशला मका निर्यात करते.

2020-21 या आर्थिक वर्षात कंपनीचे एकूण उत्पन्न 752.03 कोटी रुपये एवढे होते. वर्षभरापूर्वी हा आकडा 810.31 कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष 2021 मध्ये कंपनीचा 12.18 कोटीचा निव्वळ नफा होता. मागील आर्थिक वर्षात कंपनीचा नफा 8.33 कोटी रुपये होता.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments