स्पोर्ट

Virat Kohli 100th Test Match : ज्याची सचिनसोबत तुलना, तो क्रिकेटपटू आता कुठेय?

विराट कोहली क्रिकेटच्या विश्वात आला आणि त्याने सर्वच बदलून टाकले. उजव्या हाथाने फलंदाज करण्यामुळे तो नेहमी चर्चेत राहिला आणि सर्वोत्तम फलंदाज म्हणून त्याची ओळख निर्माण झाली आहे.

Virat Kohli 100th Test Match : विराट कोहली क्रिकेटच्या विश्वात आला आणि त्याने सर्वच बदलून टाकले. उजव्या हाथाने फलंदाज करण्यामुळे तो नेहमी चर्चेत राहिला आणि सर्वोत्तम फलंदाज म्हणून त्याची ओळख निर्माण झाली आहे. अगदीच लहानपणापासून क्रिकेटची आवड असलेला मुलगा आज क्रिकेटचा बादशहा झाला आहे.

2008 मध्ये झालेल्या मलेशियातील अंडर 19 आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वचषक संघाचा तो कर्णधार होता. हळूहळू त्याने 2011 क्रिकेट विश्वचषकात स्वतःची जागा निर्माण केली. तो आपला पहिला कसोटी सामना 2011 मध्ये वेस्ट इंडीज विरुद्ध किंगस्टन येथे खेळला. 20-20 क्रिकेट विश्वचषक 2014 मध्ये मालिकावीराचा पुरस्कार मिळवत टी20 मध्येही आपले नाव झळकावले.

2012 मध्ये विराट भारतीय एकदिवसीय क्रिकेटचा उपकर्णधार झाला मग 2014 मध्ये तो कर्णधार झाला. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले आहेत. प्रत्येक वर्षी 1000 धावा असे सलग 4 वर्ष त्याने केले त्यामुळे तो जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. तसेच 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वात जलद 1000 धावा पूर्ण करणारा फलंदाजही ठरला आहे.

विराटला आता “विराट द रन मिशन” असे संबोधले जाते. विराटने अनेक पुरस्कार मिळवले. त्याने आपल्या आयुष्यात खूप कष्ट केले आणि या ठिकाणी आला आहे. धोनीसोबत काम करून आपणदेखील त्याच्यासारखे पुढे जाऊ शकतो हे त्याने शक्य करून दाखवले आहे.

त्याला आयसीसी सर्वोत्कृष्ट एकदिवसीय खेळाडू 2012 आणि 2011-12 व 2014-15चा बीसीसीआयचा पुरस्कार सुद्धा मिळाला. 2013 मध्ये त्याने अर्जुन पुरस्कार प्राप्त केला. 2014 मध्ये ‘स्पोर्ट्सप्रो’ नावाच्या इंग्लंडच्या मासिकमध्ये दुसरा उल्लेखनीय खेळाडू म्हणून संबोधले आहे. तो आयएसएलच्या एफ.सी.गोवा आणि आयपीटीएलच्या यूएई रॉयल्सचा सह-मालक आहे. विराट हा जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे.

100 कसोटी सामने खेळणारा केवळ 12वा भारतीय क्रिकेटपटू बनल्याचा गौरव आज म्हणजेच 4 मार्च 2022ला झाला. आणि आज त्याला सौरव गांगुलीने 100 कसोटी सामन्याची कॅप देत विराटला मैदानावर सन्मानित केले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments