फेमस

परदेशी पर्यटकांचा मुंबई अड्डा, ‘या’ ठिकाणांना परदेशी पाहुणे देतात सर्वाधिक भेट

परदेशी पाहुण्यांना मुंबईमधील प्रत्येक गोष्ट आवडते. पण ही पाच ठिकाणं, त्यांना सर्वाधिक पाहावीशी वाटतात.

Foreign Tourist In Mumbai : मुंबईत हजारो ठिकाणे आहेत, जी पर्यटकांनी पाहिली पाहिजे. मात्र अशी काही महत्त्वाची ठिकाणेदेखील आहेत. जी पाहण्यासाठी खासकरुन अनेक लोक परदेशातून येत असतात. त्यातलीच काही मोजकी ठिकाणे आपण आज पाहणार आहोत. परदेशी पाहुण्यांना मुंबईमधील प्रत्येक गोष्ट आवडते. पण ही पाच ठिकाणं, त्यांना सर्वाधिक पाहावीशी वाटतात.

क्रॉफर्ड मार्केट – मुंबई हे प्रसिद्ध शॉपिंग सेंटर म्हणावं लागेल. अनेक गोष्टी स्वस्तात मस्त मिळणारी मुख्य बाजारपेठ म्हटला, तरी हरकत नाही. या मोठ्या बाजारपेठेत, पॅक केलेल्या खाद्यपदार्थांपासून कच्चे मांस, फळे आणि सुका मेवा मिळू शकतो. पार्टी आणि बेकिंगच्या वस्तूंचाही इथे तुटवडा नाही. येथील अनेक दुकाने घाऊक किमतीत त्यांची उत्पादने विकतात आणि अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी देखील येथे आहेत, ज्या तुम्हाला इतर कोणत्याही बाजारपेठेत मिळू शकत नाहीत.

धारावी झोपडपट्टी – धारावी ही जगातील सर्वात मोठी वस्ती म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी येणारे पर्यटक आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी पाहण्यास विसरत नाहीत. येथे शेकडो छोटे उद्योग आहेत. तसेच, टूर मार्गदर्शक देखील येथे उपस्थित आहेत, जे येथे येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला या वस्तीबद्दल तपशीलवार सांगतात.

गेटवे ऑफ इंडिया – गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईची सर्वात सुंदर शिल्प म्हटला तरी हरक नाही. येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या आठवणीत ही इमारत असतेच. किंग जॉर्ज पंचम आणि राणी मेरी यांच्या मुंबई भेटीच्या निमित्ताने ही वास्तू उभारली होती. कुलाबाच्या गजबजलेल्या भागात उभारलेल्या या शिल्पाची विजयी कमान म्हणून रोमन भाषेत नोंद आहे.

हाजी अली दर्गा – हाजी अली ही एक मशीद आणि समुद्राच्या मधोमध वसलेली एक दर्गा आहे, जिचे सौंदर्य तुम्ही शब्दात वर्णन करू शकत नाही. पीर हाजी अली शाह बुखारी यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी परदेशी पर्यटक वरळीला येतात. ही मशीद इंडो-इस्लामिक स्थापत्य शैलीत बांधलेली आहे. ही आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत उघडी असते.

लिओपोल्ड कॅफे – लिओपोल्ड कॅफेदेखील परदेशी पाहुण्यांच्या यादीत समाविष्ट आहे. येथे तुम्हाला अनेकदा एकापेक्षा जास्त परदेशी पर्यटक दिसतील. 1871 मध्ये स्थापन झालेला हा कॅफे दिसायला अगदी साधा आहे, पण इथले खाद्यपदार्थ हे तुम्हाला कुठे मिळणार नाहीत. या ठिकाणी नेहमी मोठी गर्दी असते, त्यामुळे तुम्हाला तिथे बसण्यासाठी अनेकदा वाट पाहावी लागतेच.

श्री सिद्धिविनायक मंदिर – मुंबईतील अनेक गोष्टी तुमच्याकडून पाहण्यापासून राहिल्या असतील. मात्र श्री सिद्धिविनायक मंदिराला तुम्ही भेट दिला नाही, असं कधीच होणार नाही. मुंबईच्या प्रभादेवी येथे असलेल्या सिद्धीविनायकाची मोठी महिमा आहे. अनेक लोक खूप लांबून सिद्धीविनायकाचे दर्शन घेण्यासाठी मुंबईत येत असतात.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments