राजकारण

सोनियाजींना मविआमध्ये यायचंच नव्हतं, मात्र एका गोष्टीमुळे काँग्रेस सामील झाली…

काँग्रेसला या सरकारमध्ये सामील होण्यामागे उद्देश वेगळा होता. सोनिया गांधींनी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्रीपदाची मागणीही केलेली नव्हती.

Nana Patole News : नाना पटोले यांनी रविवारी बीड येथील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाशी संबंधित कार्यक्रमात महाविकास आघाडीत सहभागी होण्याचे कारण सांगितले. काँग्रेसचा या सरकारमध्ये सामील होण्यामागे उद्देश वेगळा होता. सोनिया गांधींनी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्रीपदाची मागणीही केलेली नव्हती.

महाविकास आघाडीत सहभागी होण्यास काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तयार नव्हत्या. त्या मोठ्या प्रयत्नाने तयार झाल्या. त्यांनी अनेकदा नकार दिला होता. पण फक्त एका गोष्टीमुळे त्यांनी हो म्हटलं. यानंतर महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी मिळून बिगर भाजप सरकार स्थापन केले. असं मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मांडलं आहे.

सोनिया गांधींनी महाविकास आघाडीत येण्याचं एकच कारण होतं, ते म्हणजे भाजप. भाजपला दूर ठेवण्याच्या एकाच हेतूने काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीमध्ये सामील झाला. म्हणजेच त्यामागे महाराष्ट्रात भाजपला रोखण्याचा हेतू होता. सत्तेत सहभागी होण्याचा हेतू नव्हता.

रविवारी मुंबई पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांच्या दोन तासांच्या चौकशीबाबत नाना पटोलेंना पत्रकारांनी त्यांचे मत विचारले असता, नाना पटोले या मुद्द्यावरही खुलेपणाने बोलले. नाना पटोले म्हणाले, ‘इतरांवर कारवाई झाली की हे लोक पेढे वाटतात. त्यांनाच चौकशीतून जावे लागते तेव्हा ते अडचणीत येतात. ही भाजपची जुनी संस्कृती आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments