फेमस

स्वत: च्या सिनेमाची तिकीट विकायची वेळ शाहरुखवर का आली होती?

शाहरुख खानची गणना सध्या चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी आणि मोठ्या अभिनेत्यांमध्ये केली जाते.

Shah Rukh Khan : शाहरुख खानची गणना सध्या चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी आणि मोठ्या अभिनेत्यांमध्ये केली जाते. जवळपास 3 दशकांपासून तो बॉलीवूडमध्ये यशस्वी कामगिरी करत आहे. शाहरुखने फक्त भारताच नाही, तर जगभरातल्या मनोरंजन क्षेत्रात मोठं नाव कमवलं आहे. मात्र या त्याच्या यशामागे त्याची मोठी मेहनतही महत्त्वाची आहे.

शाहरुखने त्याच्या 1994 मध्ये आलेल्या ‘कभी या कभी ना’ या चित्रपटाची तिकिटेही विकली होती. मुंबईतील गेटी गॅलेक्सी थिएटरमध्ये त्याने हे काम केलं होतं. या चित्रपटात शाहरुखसोबत सुचित्रा कृष्णमूर्ती, दीपक तिजोरी हे प्रमुख भूमिकेत होते.
या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्यावेळी नव्या इंडस्ट्रीत आलेल्या शाहरुखने खूप वेगळी पद्धत अवलंबली होती. शाहरुख खानने मुंबईतील गेटी गॅलेक्सी थिएटरमध्ये ‘कभी या कभी ना’ची आगाऊ तिकिटे विकली. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहरुखने ही पद्धत अवलंबली होती.

शाहरुखने विकली होती 25 हजारांची तिकिटे

25 हजार रुपयांची तिकिटे एकट्या शाहरुखने विकली होती. शाहरुखची प्रमोशनची ही पद्धत चांगलीच हिट ठरली आणि नंतर इतर कलाकारांनीही तसच करायला सुरुवात केली. शाहरुखच्या या चित्रपटाचे समीक्षकांनीदेखील खूप कौतुक केले होते.

शाहरुख खान सध्या त्याच्या नवीन चित्रपट पठाणचे शूटिंग करत आहे. या वर्षी हा चित्रपट पूर्ण होणार आहे. शाहरुखने पुढील वर्षी 25 जानेवारी 2023 रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबतच दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमदेखील दिसणार आहेत. शाहरुख बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या झिरोमध्ये शाहरुख शेवटचा दिसला होता.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments