राजकारण

आदित्य ठाकरेंच्या ‘तो’ कवितांचा संग्रह आणि बाळासाहेबांच्या हस्ते उद्घाटन…

1990 मध्ये आदित्य ठाकरे यांचा जन्म झाला. ते राजकारणात संक्रिय असले तरी त्यांना कवितांचीदेखील मोठ्या प्रमाणात आवड आहे.

Aditya Thackeray Poem : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानात झालेल्या मेळाव्यात आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. शरद पवारांनी 1999 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना केल्यापासूनच राज्यात जातीपातीचे राजकारण सुरू झाल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी यावेळी केला.

राज ठाकरेंच्या सभेनंतर महाविकास आघाडीकडून त्यांच्या वक्तव्यांवर टीका सुरु झाली. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलंय. एका कार्यक्रमात बोलताना आदित्य ठाकरे यांनी मनसे म्हणजे भाजपाची सी टीम असल्याचा उल्लेख केला. तसंच टाइमपास टोळीला काम मिळालं हे पाहून बरं वाटलं असा टोलाही लगावला. जो पक्ष गेली इतकी वर्ष आपली भूमिका स्पष्ट करु शकला नाही त्यांच्याकडे किती लक्ष द्यायचं याचा विचार केला पाहिजे, असंही ते म्हणाले.

आदित्य ठाकरे कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेचा विषय जरूर ठरतात. एखाद्या नेत्याने शिवसेनेवर टीका केली तर आदित्य ठाकरे काय उत्तर देतील याकडे सर्वांचे लक्ष असतं. परंतु अनेकांना माहीत नसेल की आदित्य ठाकरे राजकीय प्रवास सोडला तर ते एक कवीदेखील आहेत.

1990 मध्ये आदित्य ठाकरे यांचा जन्म झाला. ते राजकारणात संक्रिय असले तरी त्यांना कवितांचीदेखील मोठ्या प्रमाणात आवड आहे. आदित्य ठाकरे यांचा 2007 मध्ये my thoughts in white and black हा त्यांचा पहिला कविता अंक बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशित झाला आहे. तर 2008 मध्ये उम्मीद नावाचा अल्बम प्रकाशित झाला. राजकीय घडामोडीत अडकल्यानंतर आदित्य ठाकरेंचे कवितांकडे दुर्लक्ष झाले असं म्हणतात, मात्र कवी मनाच्या आदित्य ठाकरे यांनी राजकारणापलीकडेही आपली कविताची आवड जपली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments