राजकारण

…आणि बाळासाहेबांच्या एका शब्दावर राज ठाकरेंनी क्रिकेट सोडलं

पाडवा मेळावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कोणावर आरोप करणार त्यांची तोफ कशी गरजणार याची संपूर्ण चर्चा मनसे सैनिकांमध्ये आहे.

Raj Thackeray Cricket : कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात आणि देशात सण अत्यंत साध्या पद्धतीने साजरे झाले. परंतु राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रातील 1 एप्रिलपासून निर्बंध मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचं वातावरण आहे. जेव्हा निर्बंध लावण्यात आले होते तेव्हा देखील एका विषयाची चर्चा होती तो विषय म्हणजे दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे होणारा मनसेचा गुढीपाडवा मेळावा. या पाडवा मेळावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कोणावर आरोप करणार त्यांची तोफ कशी गरजणार याची संपूर्ण चर्चा मनसे सैनिकांमध्ये आहे.

मनसेच्या सुरवतीपासून राज ठाकरे अनेक कारणांमुळे चर्चेचा विषय ठरतात. त्यांची लहानपणाची सवयी, वकृत्व, आरोप – प्रत्यारोप त्यांच क्रिकेट, त्यांची बोली यावरून राज ठाकरे नेहमी चर्चेत असतात. राज ठाकरेंना खरं तर क्रिकेटची मनापासून आवड होती परंतु एका घातपातामुळे राज ठाकरे यांना क्रिकेट सोडून द्यावं लागलं.

राज ठाकरे यांना क्रिकेटची अतिशय आवड होती. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र क्रिकेट खेळताना फोटो देखील आहेत. राज ठाकरे गल्ली क्रिकेटमध्ये अंडर आर्म बॉलिंग करण्यासाठी प्रसिद्ध होते. या खेळाची आवड त्यांची एवढी वाढली की पुढे खेळ खेळण्यासाठी त्यांना कोच म्हणून अण्णा वैद्य यांच्याकडे पाठवण्यात आले.

राज हे एकदा नेटमध्ये नेट प्रॅक्टिस करताना एक वेगवान चेंडू त्यांच्या पायावर बसला आणि पाय सुजला. बाळासाहेब ठाकरे त्यांना म्हणाले आता पायावर निभावलं हेच हाताला लागला असत तर? तुला चित्रकार व्हायचं आहे ना? तर त्यावर लक्ष केंद्रित कर. असं नको व्हायला कि तू ना धड चित्रकार आहेस, ना धड क्रिकेटर! बाळासाहेबांच्या या म्हणण्यानुसार राज ठाकरे यांनी क्रिकेटचा नाद सोडून दिला आणि व्यंगचित्रकार याकडे लक्ष केंद्रित केलं. या प्रसंगाचा उल्लेख लेखक धवल कुलकर्णी यांनी ठाकरे विरुद्ध ठाकरे या पुस्तकात केला आहे. यापुढे अनेक व्यंग चित्रांमुळे देखील राज ठाकरे चर्चेत होते.

संबंधित बातम्या :

राज ठाकरे दिसणार नव्या भूमिकेत; आनंदाची बातमी

संपूर्ण राज्यात मराठी दिवसाच्या निमित्तानं मराठीमय वातावरण करा राज ठाकरेंचे आदेश

राज ठाकरे यांचे ‘हे’ दोन फोटो पाहून तुम्हाला काय वाटतं?

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments