बीएमसी

आताच्या कंडिशनमध्ये निवडणुका झाल्या, तर शिवसेनाच BMC वर झेंडा फडकवेल

आता तुम्हाला वाटेल की शिवसेनेच्या बाजूने ही पोस्ट आहे, पण तसं मुळीच नाही.

BMC Election : आता तुम्हाला वाटेल की शिवसेनेच्या बाजूने ही पोस्ट आहे, पण तसं मुळीच नाही. मुंबईत सुरु असलेल्या 6 घडामोडींवरुन असा निष्कर्ष काढला जातोय की मुंबईच्या महानगर पालिकेवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकवू शकतो. आता विरोधी पक्ष कमजोर आहेत, असा त्याचा अर्थ मुळीच नाही, पण सध्या शिवसेनेकडे तितकी ताकद आहे, हे नक्की. एका वाक्यात हे सगळं निकालाचं गणित सांगता येणार नाही, म्हणून आमच्या टीमने 6 मुद्द्यांवर चर्चा केली, त्यावरुनच हा लेख आम्ही मांडत आहोत.

सुरुवात पालिकेच्या कामांवरुन करु.

मुंबई पालिकेचा अर्थ संकल्प हा खूप महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष वळवतो. 46 हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प 2022-23 च्या वर्षासाठी पालिकेने सादर केला. याची घोषणा केल्याच्या काही दिवसांनंतर मुंबई पालिकेचा कार्यकाळ संपला आणि प्रशासकाचं राज्य आलं. तसं असलं तरी शिवसेनेच्या नगरसेवकांच्या माध्यमातून ही कामे केली जात असल्याचा अर्थ नागरिकांपर्यंत जाणार. तिथेचं नागरिकांना शिवसेनेने केलेलं काम दिसून येईल.

दुसरा मुद्दा म्हणजे शिवसेना नगरसेवकांची ताकद

मुंबईत असं म्हणतात की एका आमदाराला जितकं महत्त्व आहे, तितकंच इथल्या नगरसेवकालाही असतं. त्यातच भर म्हणजे शिवसेनेकडे नगरसेवकांची आणि ग्रांऊड लेव्हलच्या कार्यकर्त्यांची ताकद जास्त आहे. अनेकदा ती मतदानातूनही दिसून येतेच. पण हाकेला धावून येणारी मंडळी शिवसेनेच्या नगरसेवकांनी तयार करुन ठेवलेत, हा शिवसेनेचा फायदा आहे.

युवासेनेचा कॉन्टॅक्ट

शिवसेनेच्या युवा नेत्यांचा घटक म्हणजे युवासेना. याच युवासेनेमध्ये वरुण सरदेसाईसारखी अॅक्टिव्ह तरुण मंडळी आहेत. मुंबईतल्या प्रत्येक भागात युवासेनेचे कार्यकर्ते आहेत. सभा घेणे असो, कोणते कार्यक्रम घेणे असो की स्थानिक पातळवीर अनेक घाडमोडी असो, युवासेनेचे कार्यकर्ते आवर्जून हजर असतात. आदित्य ठाकरेंकडे युवासेनेचं नेतृत्वपद आल्यापासून युवासेनेमध्ये अनेक बदल झाल्याचंही पाहायला मिळतं.

आदित्य ठाकरेंचं काम

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत अनेक कामांना, अनेक ठिकाणांच्या सुशोभिकरणांना सुरुवात झालेय. आदित्य ठाकरे अशा कामांमध्ये स्वत: लक्ष घालतात. त्या कामाची पाहणी करणे असो की नव्या कामांना सुरुवात करणे असो, इतकंच नाही तर पर्यावरणाच्या दृष्टीने मुंबईत नवे प्रोजेक्ट लॉंच करण्यामागेही आदित्य ठाकरेंचा हातभार आहेच.

मुंबई तोडण्याची भाषा

गेल्या काही दिवसांपासून मुंबई तोडण्याचा आरोप भाजपवर सतत होत आहे. शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर असो, संजय राऊत किंवा स्वत: उद्धव ठाकरे असोत, मुंबई तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपवर करत आहेत. मुंबई तोडण्याच्या मुद्द्यामुळे अनेक मुळचे मुंबईकर शिवसेनेकडे आकर्षले जात आहेत. हा एक फायदा शिवसेनेला होऊ शकतो.

राष्ट्रवादीचा पाठिंबा

आता सगळ्या गोष्टी कमी जास्त प्रमाणात असल्या तरी ‘राष्ट्रवादीचा पाठिंबा’ ही गोष्ट विसरून चालणार नाही. राष्ट्रवादीच्या अजित पवार, सुप्रिया सुळे किंवा स्वत: शरद पवार यांनी मुंबई पालिकेवर शिवसेनेचा महापौर असणार, हे घोषित केलंय. त्यामुळे जिथे भाजप सोडून गेल्याची पोकळी आहे, ती पोकळी नक्कीच राष्ट्रवादी भरून काढण्याचा प्रयत्न करेल, इथं राष्ट्रवादीलाही मोठा फायदा होऊ शकतो, हे नक्कीच.

2022 ची परिस्थिती

मागील महापालिकेमध्ये फक्त 227 नगरसेवक होते, मात्र येत्या निवडणुकीत वार्ड रचनांमध्ये बदल करण्यात आलाय. त्यानुसार तब्बल 236 नगरसेवक हे पालिकेवर निवडणून जाणार आहेत. या प्रस्तावाला मंत्रिमंडळाकडूनही परवाणगी मिळाली आहेच आणि याचाच फायदा शिवसेनेला होऊ शकतो, असं काही भाजपच्या नेत्यांना वाटतं. तसा आरोपही त्यांनी शिवसेनेवर केला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments