क्राईम

KGF मध्ये रॉकीच्या आधी कलाश्निकोव्ह वापरणारा डॉन मुंबईत होता…

दाऊदचा ठिकाणा कुठे आहे, हे सध्या कोणच ठामपणे सांगू शकलं नाही, पण स्वत:ला चर्चेत ठेवण्यासाठी तो स्वत: अनेक बातम्या पेरत असतो, असं म्हटलं  जातं.

Kalashnikov History : तसं पाहिलं गेलं तर मुंबईचं अंडरवल्ड जरी आताच्या पिढीने पाहिलं नसलं, तरी ते वर्ल्ड असं घडलंय, ज्यामुळे त्याला अंडरअस्टिमेट करुन चालणार नाही. याच अंडरवर्ल्डमध्ये आतापर्यंत टिकून राहिलेलं एक नाव म्हणजे दाऊद इब्राहिम कासकर. या दाऊदचा ठिकाणा कुठे आहे, हे सध्या कोणच ठामपणे सांगू शकलं नाही, पण स्वत:ला चर्चेत ठेवण्यासाठी तो स्वत: अनेक बातम्या पेरत असतो, असं म्हटलं  जातं. या दाऊदसाठी भल्याभल्यांनी कामं केली आहेत, ते सगळे त्यांच्या त्यांच्या कामात बाप होते, अशाच एका बाप माणसाची कहाणी आज आपण पाहणार आहोत. त्याचं नाव आहे सुभाष सिंग ठाकूर.

काही दिवसांपूर्वी KGF चाप्टर 2 हा सिनेमा आला. तसा तो टॉलिवूडचा आहे, म्हणून हलक्यात घेऊन चालणार नाही. कारण टॉलिवूडने आपल्या सिमेसृष्टीत प्रमाणाच्या बाहेर प्रगती केल्याने त्यांचं प्रोडक्शन पाहण्यासारखं आहे. या सिनेमामध्ये एक सीन दाखवला आहे. KGF च्या हिरो रॉकीवर जेव्हा हल्ला होतो, तेव्हा तो दुबईला जातो.

kgf kalashnikov gun scene
kgf kalashnikov gun scene

तिथे त्याची भेट इनायत खलील सोबत होते, त्याच भेटीमध्ये त्याच्या नजरेत कलाश्निकोव्ह नावाची रायफल येते. ती रायफल त्याला आवडते आणि तशा हजारो रायफल्स तो घेऊन येतो. तिथून आल्यानंतर पहिला हमला तो त्याचा शत्रू अधिरावर करतो. हातात रायफल नसतानाही रॉकी कलाश्निकोव्ह चालवण्याची अॅक्टिंग करतो, त्यानंतर त्याच्या मागून गोळ्यांचा वर्षाव होतो.


सांगायचा मुद्दा इतकाच की या सीननंतर कलाश्निकोव्ह रायफल चर्चेत आली. हीच कलाश्निकोव्ह रायफल मुंबईतला गूंड सुभाष सिंग ठाकूर बिनधास्तपणे वापरायचा.

तुमच्या माहितीसाठी म्हणून कलाश्निकव्ह हा AK-47 किंवा AK-56 या सिरीजमधलाच एक प्रकार आहे. AK चे पूर्ण नाव रशियन भाषेत अॅव्टोमॅट कलाश्निकोव्ह (Avtomat Kalashnikov) आहे. सामान्य भाषेत त्याला कलाश्निकोव्ह म्हणतात. या रायफलचा शोध सार्जंट मिखाईल कलाश्निकोव्ह या संशोधकाने लावला. दुसऱ्या महायुद्धात कलाश्निकोव्ह हा टँक कमांडर होता. असं म्हटलं जातं की कलाश्निकोव्ह ही कोणत्याही हवामानात आणि कोणत्याही ठिकाणी अडकून न पडता सतत गोळ्या झाडणारी रायफल आहे.

ही रायफल 1900 च्या शतकात फार कमी सुरक्षा यंत्रणेकडे होती. मात्र सुभाष सिंग ठाकूरसारख्या बड्या गुंडांकडे ही रायफल असायची. सुभाष सिंग ठाकूर हा आपल्या कामाशी नेहमी प्रामाणिक होता. तो आपल्या दुश्मनांसह मित्रांच्या हालचालीवरही नजर ठेवत असे. त्याचा नेम, त्याची बुद्धिमता, काम करण्याची पद्धत, अशा सगळ्या गोष्टींमुळे सुभाष सिंग ठाकूर हा दाऊदच्या नजरेत आला. दाऊदने त्याला आपल्या टोळीत घेतलं. दाऊदच्या सगळ्या महत्त्वाच्या कामावर सुभाष सिंग ठाकूरची नजर होती. इतकंच नव्हे तर मुंबईतल्या दाऊदचा धंदा दुप्पट करुन देणाऱ्या राजनवरही सुभाष सिंग ठाकूरची नजर होती, हीच गोष्ट राजनला पटत नव्हती, आपण दाऊदसाठी इतकं करुनही आता टोळीत आलेला एक व्यक्ती आपल्यावर नजर ठेवतोय, हे राजनला पटत नव्हतं.

सुभाष सिंग ठाकूर हा तसा वारणसीचा, मात्र 1900 च्या शतकाच जसं अनेकांनी मुंबईला आपली जान माणली, तसंच सुभाष सिंग ठाकूरही आपलं नशिब आजमावण्यासाठी मुंबईत आला होता. हळू हळू राजन आणि सुभाष सिंग ठाकूर यांच्यात खटके उडत होते, इतकंच काय तर सुभाष सिंग ठाकूरने राजनच्या 3 माणसांनाही काठमांडूमध्ये नेऊन ठार केलं होतं. तेव्हापासून सुभाष सिंग ठाकूर आणि राजन हे एका टोळीत असूनही एकमेकांचे विरोधक झाले.

या दोघांचा वादही दाऊदला हवासा होता, कारण आपल्या हाताखालील मोठे लोक भांडत असले तर आपली खुर्चीही सलामत राहते आणि कोण आपल्यावर बोटही उचलत नाही, कारण ते आपापसात भांडण्यातच व्यस्त असतात.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments