राजकारण

राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागितली तर काय होईल?

अयोध्या दौऱ्यामुळे हिंदुजननायक अशी झालेली प्रतिमा पुन्हा मराठी अस्मितेच्या मानबिंदुकडे वळण्याची दाट शक्यता आहे.

Raj Thackeray Ayodhya : बातमीचं टायटल पाहून थोडाफार मुद्दा समजला असेल, तरीही सुरुवातीपासून माफी मागण्यापर्यंत मुद्दा कसा पोहचला, हे तुम्हाला सांगणं आमचं कर्तव्य आहे. त्याचं झालं असं की राज ठाकरे यांची गुढी पाडव्यादिवशी सभा झाली. तिथून त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्याला भेद केला. त्यानंतर राज ठाकरे यांच्यावर टीका झाली म्हणून त्यांनी स्वत:च उत्तर सभा घेतली. यानंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. तिथं त्यांनी घोषणा केली की मी उत्तर प्रदेशच्या अयोध्येला जाणार.

आता अयोध्येला का जाणार असा सवाल पत्रकारांनी ठाकरेंना केला. त्यावर त्यांनी मिश्किल उत्तर दिलं. बरेच दिवस प्रवास केला नाही, हाच ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचा उद्देश, असं उत्तर मिळालं. ठाकरे घराण्यातील अनेकजण अयोध्येला गेलेत. उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेही अयोध्येला जाऊन आलेत. यानंतर राज ठाकरेही अयोध्येला जाणार म्हटल्यावर काही नवीन वाटत नव्हतं. पण राज ठाकरे अयोध्येला जाणार यात ट्विस्ट तेव्हाच आला, जेव्हा ठाकरेंच्या या दौऱ्याला विरोध झाला.

आता ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध कोणी केला, का केला, हे पाहूच, पण आधी राज ठाकरे यांच्या मनसेची पार्श्वभूमि पाहणं गरजेचं आहे.

वर्ष 2008 मध्ये महाराष्ट्रात रेल्वेभरतीचे नियोजन करण्यात आलं होतं. यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार अशा राज्यातूनही परीक्षार्थी आले होते, आधी मराठी तरुणांना प्राधाण्य मिळावं म्हणून त्यावेळी मनसे आक्रमक होती. सहाजिकच त्या काळात राज ठाकरे यांचा मराठीचा बाणाही होताच, यामुळे मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीय तरुणांना मारहाण केल्याचं म्हटलं जातंय. हाच 2008 मधील राग 2022 मध्ये राज ठाकरेंवर काढला जातोय.

राज ठाकरे यांच्या दौऱ्याला उत्तर प्रदेशमधील केसरगंज मतदार संघातील भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी विरोध केलाय. या बृजभूषण यांची मागणी एकच आहे, ती म्हणजे मराठी मुद्यामुळे ज्या उत्तर भारतीयांवर अनेक आरोप केले, त्यांना मारहाण केली, त्या उत्तर भारतीयांची राज ठाकरे यांनी माफी मागावी. राज ठाकरे जेव्हा उत्तर भारतीयांची माफी मागतील, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी स्वत: बृजभूषण शरण सिंह जातील, असं त्यांनीच अनेक माध्यमांशी बोलताना सांगितलं. आता प्रश्न हा पडतो की राज ठाकरे माफी मागणार का? आणि माफी मागितली तर काय होईल?

या प्रश्नांची उत्तरे देण्याआधी तुम्हाला अजून एक गोष्ट समजावून घेणं गरजेचं आहे. आपल्या अयोध्याच्या दौऱ्यावर माध्यमांशी बोलण्यासाठी राज ठाकरे यांनी आपल्याच कार्यकर्ते, पदाधिकारी, नेत्यांना मज्जाव केलाय. ठाकरेंनी खडसावून सांगितलंय की माझ्या अयोध्याच्या दौऱ्याबद्दल कोणीही बोलू नका. आता ज्यांना अयोध्या दौऱ्याबद्दल बोलण्याची परवानगी आहे अशा प्रवक्त्यांनीही या मुद्यावर राज साहेब स्वत: बोलतील, अशी प्रतिक्रिया दिलीये. सांगायचा मुद्दा इतकाच की उत्तर प्रदेशमधून भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह, हे जरी आगपाखड करत असले, तरी इकडून खळखट्याक करणारी मनसे शांत आहे. आता आपल्या मुद्यावर येऊ.

राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून मराठीचा मुद्दा बाजूला ठेवून हिंदुत्वाचा मुद्दा बाहेर काढलाय. त्याचा येणाऱ्या काळात फायदा होईल की नाही, हे राजकीय विश्लेषक आणि मनसेचे नेतेच सांगितल.

पण राज ठाकरे यांनी माफी मागितली नाही, तर मुंबईतील अमराठी हिंदु उत्तर भारतीयांचा ठाकरेंना मतांच्या स्वरुपातील पाठिंबा मिळणार नाही. राज ठाकरे यांच्या विरुद्ध उत्तर भारतीयांची सुरु असलेली लढाई सुरुच राहिल. ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला मोठा विरोध होईल, तिथे उत्तर भारतीय विरुद्ध राज ठाकरे असा संघर्ष होईल, तिथे या दोघांमधील संघर्ष वाढला तर हिंदुजननायक अशी झालेली प्रतिमा पुन्हा मराठी अस्मितेच्या मानबिंदुकडे वळेल.

जर ठाकरेंनी माफी मागितली तर राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांसमोर माघार घेतली, असा संदेश पसरेल. मुंबईसह महाराष्ट्रातील मराठी नागरिक नाराज होतील, ज्या मराठी सैनिकांचा मनसेला पाठिंबा आहे, तो कमी होईल, असं म्हटलंय जातंय.

माफी मागण्याच्या मुद्यावरुन आणि बृजभूषण यांच्या दादागिरीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करून राज ठाकरे यांनी दौरा रद्द केला तर मनसेतील पदाधिकाऱ्यांमध्ये चुकीचा संदेश जाईल.

राज ठाकरेंनी आतापर्यंत वेळ आली की अनेक गोष्टींना थेट उत्तर दिलंय, त्यामुळे आता ही अयोध्या दौरा, बृजभूषण सिंह आणि उत्तर भारतीयांची माफी, अशा मुद्यांना वेळ आली तरंच उत्तर देतीलच; पण तोपर्यंत उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील पुलाखालून भरपूर पाणी गेलं असेल, हे नक्की.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments