राजकारण

उद्धव ठाकरेंनी जहरी टीका करुनही राज ठाकरे शांत का बोलले?

ही स्टोटी आहे दोन भावांची. रक्ताचं नातं नाही, पण हक्काचं नातं, म्हणून या दोन भावांकडे पाहिलं जातं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे.

Raj Thackeray Speech : उद्धव ठाकरे हे आता शिवसेना सांभाळत आहेत, तर राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सांभाळत आहेत. तसं पाहिलं तर आताचं राजकारण हे आधीच्या म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातल्या राजकारणापेक्षा खूपच पुढे गेलंय किंवा बदललं आहे, असंच म्हणावं लागेल. झालंयही अगदी तसंच.

ज्या वेळेस राज ठाकरे हे राजकारणात अनेक निर्णय घेणे, संघटना उभी करणे, बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून राजकारणाचे धडे घेत होते, तेव्हा उद्धव ठाकरे या सगळ्यापासून दूर होते, नंतर त्यांची राजकारणात एन्ट्री झाली आणि अनेक गोष्टी घडत गेल्या. उद्धव ठाकरे यांची राजकारणात एन्ट्री, हीच राज ठाकरे यांच्या शिवसेनेतून एक्झिटची सुरुवात झाली होती. त्यानंतर आतापर्यंत पुलाखालून भरपूर पाणी गेलंय, मात्र खरी गोष्ट हीच की त्याकाळी उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा राज ठाकरे राजकारणात पुढे होते, हे नक्की. मात्र आता वेळ, राजकारण आणि नात्यांचा मोडही बदललाय. आता चित्र वेगळं आहे.

आता पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्री पद आहे. 56 आमदार आणि 18 खासदार इतकी ताकद सध्या शिवसेनेकडे आहे. तर मनसेकडे राजू पाटील हे एकमेव आमदार आहेत. राजकीय ताकद पाहिली तर शिवसेना सध्या पुढे आहे, आणि राजकारणात राजकीय ताकद ही त्या पक्षाच्या खासदार आणि आमदारांच्या संख्येवरुन ठरवली जाते, हेही तितकंच खरं.

असो, आजचा मुद्दा यापेक्षा थोडा वेगळा आहे. 14 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईतल्या BKC मैदानावर सभा झाली. नक्कीच ते एक प्रकारचं शक्ती प्रदर्शन होतं, मात्र त्या सभेमध्ये उध्दव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर टीका केली. मुन्ना भाई एमबीबीएस या चित्रपटातला सीन सांगत उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या राज ठाकरे यांनाच टोला लगावला होता, मात्र तो टोला सोडला तर उद्धव ठाकरे यांचं भाषण हे संपूर्णरित्या भाजप विरोधात होतं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासोबत त्यांची आघाडी असल्यामुळे उद्धव ठाकरेंनी त्या दोन पक्षांवर किंवा पक्षातील नेत्यांवर टीका केली नाही.

आता राज ठाकरे यांच्या संदर्भात बोलणं गरजेचं आहे. राज ठाकरे हे 5 जून रोजी अयोध्येला जाणार होते. इतकंच नाही, तर बाबरी मशिदीच्या प्रकरणावेळी अनेक कारसेवकांना मारून टाकलं होतं, त्या ठिकाणाचं दर्शन घेणार होते. असं राज ठाकरे यांनीच आपल्या सभेतून सांगितलं. 22 मे रोजी पुण्याच्या रंगशारदा कला, क्रिडामध्ये राज ठाकरे यांची सभा झाली. त्यावेळी त्यांनी भाजप सोडून इतर अनेक पक्षांवर टीका केली.

या सभेच्या आधी दोन दिवस राज ठाकरे यांनी एक सोशल मीडियावर पोस्ट केली होती, अयोध्या दौरा तुर्तास स्थगित झाल्याचं त्यांनी त्या पोस्टमधून सांगितलं होतं. त्यांनंतर त्यांनी आपला दौरा स्थगित झाल्याचं स्पष्टीकरण आपल्या सभेतून दिलंच मात्र हे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी खडसावलं.

उद्धव ठाकरे यांचं नाव घेत राज ठाकरेंनी हिंदुत्वाबद्दल स्पष्टीकरण दिलं. ‘तुम्हारी कमीज मेरी कमीजसे सफेद कैसे’ या डायलॉगवरुनही राज ठाकरेंनी उध्दव ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला. असं सगळं जरी असलं तरी राज ठाकरे तितक्या प्रखरतेने उध्दव ठाकरे यांना बोललेच नाहीत, जितक्या प्रखरतेने ते इतर विरोधी नेत्यांवर टीका करतात.

आता फक्त तुमच्या माहितीसाठी म्हणून, औरंगाबादमधील सभेमध्ये राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर कोणतीच टीका केली नव्हती.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments