राजकारण

भाजपच्या ट्रॅपमध्ये शिवसेनेचे 7 नेते फसले; मुंबई पालिका गेली, मातोश्रीलाही धक्का

ज्या नेत्यांवर ED, IT च्या कारवाया झाल्या आहेत, ते सगळे मातोश्री म्हणजे मुख्यमंत्री, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जवळचे असल्याचे म्हटले जाते.

ED action on Shiv Sena leaders : ज्या सात नेत्यांबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत ते 7 नेते कोण आहेत, त्यांच्यामुळे मातोश्री म्हणजेच शिवसैनिकांचं श्रद्धास्थान असलेल्या शिवसेना प्रमुखांच्या घराला धक्का कसा बसेल आणि मुंबई पालिका शिवसेनेच्या ताब्यातून कशी जाऊ शकते,  हेच आपण या लेखातून पाहणार आहोत.

अनिल परब, संजय राऊत, प्रताप सरनाईक, आनंदराव अडसूळ, यशवंत जाधव, श्रीधर पाटणकर आणि भावना गवळी या सात नेत्यांची चर्चा महाराष्ट्रात आधीही होत होती आणि आताही होत आहे. यांची चर्चा एकाच कारणाने होत आहे ते म्हणजे यांना ED कडून समन्स गेलंय आणि त्यातील काहींवर ED ने कारवाईही केली आहे.

पहिले नेते म्हणजे प्रताप सरनाईक.

प्रताप सरनाईक यांच्या लोणावळ्यातील बंगल्यावर ईडीने छापे टाकले होते. टॉप्स ग्रुपस (सिक्युरीटी) कंपनीच्या आर्थिक गैरव्यवहारांबाबत ही छापेमारी असल्याचीही माहिती समोर आली होती. नोव्हेंबर 2020 मध्ये बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात आमदार प्रताप सरनाईक, त्यानंतर त्यांचा मुलगा विहंग सरनाईक आणि त्यांचे व्यवहार भागीदार अमित चांदोळे यांची ED कडून चौकशी केली होती. अमित चांदोळे यांना अटकही करण्यात आली होती.

दुसरे नेते म्हणजे संजय राऊत

शिवसेनेचे एकमेव नेते जे ED, CBI, IT, न्यायालय अशा संस्थांच्या कारवायांविरोधात बोलतात ते म्हणजे संजय राऊत. यांनाच एकदा ED ने समन्स पाठवले होते. त्यांचे बंधू सुनिल राऊत यांच्यावरही ईडीची कारवाई झाली होती. संजय राऊत यांच्या अलिबागमधील 8 प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाईही ईडीने केली आहे.

तिसरे नेते म्हणजे आनंदराव अडसूळ

बडनेरातील शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांना सिटी बॅंक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून समन्स बजावण्यात आलं होतं. रवी राणांच्या तक्रारीनंतर अडसुळांना हे समन्स पाठवले होते. ईडीचे अधिकारी अडसुळांच्या घरीही गेले होते. त्यावेळेस अडसुळांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली होती.

चौथ्या नेत्या भावना गवळी

यवतमाळ वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळींच्या तब्बल 5 शिक्षण संस्थांवर ईडीने कारवाई केल्याची माहिती समोर आली होती. त्यावेळी भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी आरोप केले होते. पाचही शिक्षण संस्थांची यावेळी चौकशी करण्यात आली होती, माहितीसाठी म्हणून यवतमाळ वाशिम मतदारसंघातून भावना गवळी या 5 वेळा विजयी होऊन आल्या आहेत.

पाचवे नेते आणि मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर

22 मार्च 2022 रोजी ED ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मेहुणे म्हणजेच रश्मी ठाकरे यांचे बंधु श्रीधर पाटणकरांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली होती. यामध्ये ठाण्यातल्या वर्तक नगर भागातील ‘निलांबरी’ अपार्टमेंटमधील एकूण 6 सदनिका जप्त केल्यात.

मुंबई पालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव

यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव या भायखळा मतदारसंघातून आमदार आहेत. पालिकेच्या कंत्राट आणि अन्य व्यवहारांमध्येही स्थायी समितिची महत्वाची भूमिका असायची, त्याच वेळेस भाजपा नेते किरीट सोमय्यांनी यशवंत जाधवांवर मनी लॉण्ड्रिंगचा आरोप केला होता. त्याच पार्श्वभूमीवर IT (इनकम टॅक्स) विभागाने जाधवांवर कारवाई केली होती. सलग 2 ते 3 दिवस ही कारवाई चालली असल्याची माहिती आहे. आता यशवंत जाधवांना ED कडून फेमा कायद्याअंतर्गत समन्स पाठवण्यात आलं आहे.

मातोश्रीचे लाडके, शिवसेनेचे फायरब्रँड नेते अनिल परब

अनिल परब यांच्या काही मालमत्तांवर 26 मे रोजी भल्या सकाळी ED ने छापे टाकले होते. पुणे, रत्नागिरी, मुंबई अशा एकूण 7 ठिकाणी ही छापेमारी केल्याची माहिती समोर आली होती. भाजप नेते किरीट सोमय्यांनीच परबांवर त्या संबंधित कारवाई केली होती.

जी माहिती तुम्ही वाचलात, ते सगळे सात नेते हे शिवसेनेची मोठी ओळख होती आणि आहे. स्वत: शिवसेना पक्षातही त्यांची मोठी पोहोच आहे, असं असतानाही ed कडून कारवाई किंवा समन्स जाणे यामुळे पक्षाच्या इमेजला धक्का लागू शकतो, अशा पत्रकारांमध्ये चर्चा आहेत.

मुंबई महानगर पालिकेची निवडणूक काही दिवसांत होण्याची शक्यता आहे, त्या धावपळीत जर अशा शिवसेनेच्या बड्या नेत्यांवर कारवाई होऊ लागली, तर मतदारांमध्ये चुकीचा मेसेज जाऊ शकतो, अशाने पालिकेत निवडून येणाऱ्या नगरसेवकांच्या संख्येवर परिणाम होऊ शकतो, परिणामी मुंबई पालिका शिवसेनेच्या हातातून जाण्याची शक्यताही असल्याचं म्हटलं जातं.

दुसरीकडे ज्या नेत्यांवर ED, IT च्या कारवाया झाल्या आहेत, ते सगळे मातोश्री म्हणजे मुख्यमंत्री, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जवळचे असल्याचे म्हटले जाते, अशात जर त्याच नेत्यांवर कारवाई होत असेल, तर मातोश्रीच्या इमेजला सहाजिकच धक्का बसू शकतो.

आता या सगळ्यात भाजपचा काय संबंध हेही तुम्ही जाणून घेणं महत्त्वाचं आहे, ED किवा IT च्या धाडी पडण्याआधी काय घडणार आहे किंवा कोणत्या नेत्यावर धाड पडणार आहे, याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या समाज माध्यमांवर येऊन देत असतात, याचाच धागा पकडत संजय राऊत, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, किशोरी पेडणेकर आणि इतर नेते आरोप करतात, या कारवायांमागे भाजपचा हात असल्याचंही अनेक नेते खुलेपणाने म्हणतात आणि त्यामुळेच हा भाजपचा ट्रॅप असल्याच्या चर्चाच सगळीकडे सुरु आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments