राजकारण

खासदार मॅडमच्या एका फोटोवरून शिवसेनेच्या नेत्यांनी हॉस्पिटलमध्येच दंगा का घातला?

नवनीत राणांचा एक फोटो खरतनाक व्हायरल होतोय. हा फोटो फक्त त्यांचे विरोधकच नाही, तर त्यांना शहाणपणाच्या गोष्टी सांगण्यासाठी अनेकांनी तो फोटो व्हायरल केला गेला.

Navneet Rana : तुमच्या माहितीसाठी म्हणून सिटी स्कॅन ज्या खोलीमध्ये केलं जातं, तिथे अनेकप्रकारे लेझरचा वापर केला जातो, त्याचदरम्यान इतर कुठल्या लेजरचा वापर झाला (उदाहरणार्थ – कॅमेराचे लेझर) तर मशीनमधील लेझर डिस्टर्ब होतात आणि मशिनमध्ये जाणाऱ्या व्यक्तीला इजा होऊ शकते. हे सगळं टेक्निकली आहे. आमच्यापेक्षा एखादे वैद्यकीय अभ्यासक यावर व्यवस्थित सांगू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं काय, तर एमआरआय केल्या जाणाऱ्या खोलीमध्ये फोटो काढणे, चुकीचं आहे.

सहसा कुठल्याच रुग्णालयात हा प्रकार होत नाही, पण नवनीत राणांच्या बाबतीत तो झाला. राणांच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार अपक्ष खासदार नवनीत राणांना स्पोंडिलोसिसचा त्रास आहे.

आता याच आजारासंबंधित एमआरआय (MRI) चाचणी करताना नवनीत राणांना संगणकीय मशीनमध्ये शिफ्ट केलं जात होतं. त्याचवेळी खोलीतील फोटो त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्हायरल करण्यात आल्याचा दावा आहे.

आता एमआरआय (MRI) म्हणजे काय, स्पोंडिलोसिस म्हणजे काय, हे या लेखाच्या शेवटी सांगितलं आहे, जाता जाता तेही वाचून घ्या

हा फोटो बाहेर आलाच कसा, तिथे फोटो काढण्याची परवानगी राणांना दिली कोणी, त्यांना हॉस्पिटल व्यवस्थापनाने का थांबवलं नाही, असे अनेक प्रश्न घेऊन शिवसेनेच्या मनिषा कायंदे, किशोरी पेडणेकर आणि अनेक कार्यकर्त्यांनी लिलावती रुग्णालय गाठलं. कारण याच हॉस्पिटलमधील तो प्रकार आहे.

download 27 .jfif?format=webp&w=768&dpr=1

डॉक्टरांसमोर आणि लिलावती रुग्णालयातील जबाबदार अधिकाऱ्यांसमोर मोठा गदारोळ झाला आणि शेवटी शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर, मनिषा कायंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. आता ही परिषद रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या विरोधात नव्हती, तर फक्त राणा दाम्पत्य, त्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि गणधारी सुरक्षा रक्षकांच्या विरोधात होती. त्यांनी तशाप्रकारचे आरोप केले आणि फोटो कोणी काढला, कोणी परवानगी दिली, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मागितली.

असाच प्रकार राणांच्या एका वक्तव्यामुळेही झाला होता. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालिसा म्हणणार म्हणून राणा दाम्पत्याने घोषणा केली, तेव्हा शिवसैनिकांनी मातोश्री समोरील परिसर डोक्यावर घेतला होता, या सगळ्यात तोटा राणा दाम्पत्याचाच झाला, कारण त्यांना अटक झाली, मात्र शिवसैनिकांनी त्यांना सिरिअस घेतलं होतं हे नक्की, आताही एका फोटोवरून शिवसेनेच्या नेत्यांनी लिलावती रुग्णालयातच दंगा घातला.


आता थोडं स्पोंडिलोसिस म्हणजे काय ते पाहा.

एका जागेला जास्त वेळ बसलं किंवा वाकून काम केलं किंवा शरिराची हालचाल झाली नाही की अनेकांची जास्तप्रमाणात कंबरदुखी होण्यास सुरुवात होते, हा एक सामान्य आजार आहे. कंबरेला वेदना जाणवणे, मान दुखणे असे अनेक त्रास यातून जाणवून येतात, डॉक्टरांकडे गेलात, की या आजाराच्या प्रमाणानुसार स्पोंडिलोसिसचा त्रास असल्याचं डॉक्टर घोषित करून टाकतात.

आता MRI म्हणजे काय ते पाहा.

शरीराचे चुंबकीय अनुनाद इमेजिंग (MRI – Magnetic resonance imaging) शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र, रेडिओ लहरी आणि आपल्या शरीराच्या आतील भागांचे चित्र किंवा फोटो काढण्यासाठी एक भला मोठा कंम्प्यूटर वापरला जातो. याचा उपयोग प्रामुख्याने छाती, पोट आणि कंबर यांच्या संबंधातिल भागांची पाहणी करण्यासाठी केला जातो..

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments