क्राईम

सिद्धूच्या मर्डरचं अरुण गवळी कनेक्शन येताच गवळी घराण्याकडून आलं स्पष्टीकरण

सिद्धू मुसेवालाच्या हत्येचं महाराष्ट्र कनेक्शन आलं आहे. आता जे दोन महाराष्ट्रातील आहेत त्यामध्ये एक आहे सौरभ महाकाळ आणि दुसरा आहे संतोष जाधव.

Arun Gawli Santosh Jadhav : 29 मे 2022 रोजी पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला याची हत्या झाली. या हत्येमागे माझ्या टोळीचं काम असल्याचा खुलासा कुख्यात गूंड लॉरेन्स बिश्नोईने केला. आता त्याला कॅनडा कनेक्शनही दिलं जातंय. मात्र सध्या जी हत्या घडवून आणण्यात आली, त्यामध्ये सगळेजण हे भारतातले होते, त्यात 3 शूटर्स पंजाबचे, 2 महाराष्ट्र, 2 हरयाणा आणि 1 शूटर राजस्थानातील असल्याचं तपासातून समोर आलंय. आता जे दोन महाराष्ट्रातील आहेत त्यामध्ये एक आहे सौरभ महाकाळ आणि दुसरा आहे संतोष जाधव.

हे दोन्ही आरोपी सध्या फरार आहेत. पुणे ग्रामिण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोषवर अनेक गुन्हे दाखल आहेत, तर अद्याप सौरभ महाकाळची कोणतीच अपडेट समोर आलेली नाही. संतोष जाधव याच्यावर मकोका कायद्यातंर्गत गुन्हा दाखल आधीच झालाय, तर ओंकार बाणखेलेच्या खूनानंतर तो फरार असल्याची माहितीही पुणे ग्रामिणमधील पोलीस निरिक्षण अशोक शेवाळे यांनी दिली.

आता याच संतोषचं मुंबई कनेक्शनही असल्याचा पोलिसांना संशय आहेत. कारण याच संतोषचे अनेक फोटो समोर आलेत. मुंबईतील एकेकाळचे कुख्यात गूंड समजल्या जाणाऱ्या अरुण गवळी यांच्या पत्नी आशा गवळी यांच्यासोबतचे संतोषचे फोटो बघता बघता व्हायरल होऊ लागलेत. या फोटोमध्ये अरुण गवळी यांच्या पत्नी, बाजूला संतोष जाधव आणि मागे अरुण गवळी यांचा फोटो अशी फ्रेम आहे. असं म्हटलं जातं की हा फोटो अरुण गवळी यांच्या मुंबई येथील ऑफिसमधला आहे.

आता या सगळ्या खडाजंगीवर अरुण गवळी यांच्या पत्नी आशा गवळी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मुंबई तक या वृत्तवाहिनीशी बोलताना आशा गवळी यांनी ही माहिती दिली.

मी संतोष जाधवला ओळखत नाही, अनेक तरुणांना आता प्रसिद्धी हवी असते, ते आपल्यासोबतचा फोटो टाकून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात, मात्र मी सगळ्यांनाच ओळखते असं नाही. काही संबंध आला की थेट आमच्यावर आरोप केले जातात, मात्र हे बरोबर नाही, आम्हाला असं काही पाहिलं किंवा वाचलं की वाईट वाटतं. अशा गोष्टींमुळेच मी माझ्या पक्षातील अनेक कार्यकर्त्यांना पदं देणं बंद केलं आहे.

आशा गवळी यांच्या सोबत व्हायरल होणाऱ्या फोटोवरून गवळी कुटुंबाकडून स्पष्टीकरण आलं आहे, त्यामुळे सध्यातरी गवळी कुटुंबाकडून सिद्धू मुसेवालाच्या हत्येत सहभागी असलेला संशयीत आरोपी संतोष जाधव याच्याशी काहीही संबंध नसल्याचं आशा गवळी यांनी स्पष्ट केलं आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments