राजकारण

कोण कुठंही जाऊद्या, यावं तर मुंबईतच लागतंय भाऊ… कारण…

एकनाथ शिंदे हे तरुण वयापासून शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते म्हणून काम करत होते. तिथून त्यांचा मंत्रिपदापर्यंतचा प्रवास पद्धतशीर चालू होता.

कसंय मंडळी आसामच्या गुवाहाटीमध्ये काय ती झाडं, काय ते डोंगर आणि काय ते हॉटेल, असं वातावरण आहे. महाराष्ट्राचे काही आमदार आसाममध्ये गेलेत. त्यांचं तिथे कुठलं ट्रेनिंग नसून महाराष्ट्रात असलेल्या सरकारला पाडण्याचा त्यांचा उद्धेश असल्याचं समोर आलंय. त्याचं नेतृत्व शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे करत आहेत. (eknath shinde come to mumbai)

हे तेच एकनाथ शिंदे आहेत, जे त्यांच्या तरुण वयापासून शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते म्हणून काम करत होते. तिथून त्यांचा मंत्रिपदापर्यंतचा प्रवास पद्धतशीर चालू होता. होता यासाठी म्हणावं लागतंय, कारण ते आता मंत्रिपदावर जरी असले तरी ते ज्या सरकारमध्ये मंत्रिपदावर आहेत, ते मंत्रिपद त्यांना मान्य नाही. म्हणून त्यांनी वेगळ्या सरकारची चूल मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

कुठल्या सुत्रांच्या माहितीनुसार नाही, तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गुवाहाटीमध्ये गेलेल्या आमदारांचे व्हीडिओ पाहिले तर त्यांचा एकूण 42 जणांचा गट असल्याचं समोर आलंय. फक्त इतकंच नाही तर तर या 42 आमदारांपैकी ज्यांनी-ज्यांनी आतापर्यंत माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे, त्या सर्वांनी एकच भूमिका व्यक्त केली आहे, ती म्हणजे आपल्यासोबत सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर आपल्याला राहायचं नाही.

असो, हा सगळा भाग आतापर्यंत मिडीमध्ये पाहून तुम्हीही कंटाळला असाल, म्हणून आपण थोडं पुढं जाऊ. कसं आहे की महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे, याच मुंबईत मंत्रालय आहे, जिथून संपूर्ण राज्याचा कारभार चालतो. इथेच राज्यपालांचं राजभवन आहे, जिथून राज्यातल्या वैधानिक कामांवर लक्ष ठेवलं जातं आणि इथच विधान भवन आहे, जिथे राज्यातील प्रत्येक आमदारांच्या प्रश्नांना उत्तर मिळतं.

आता गेम इथंच अडकलाय. आता तुम्हाला पद्धतशीर सांगायचं म्हणजे साधी प्रोसेस एका टप्प्यात समजून घेऊ. जे काही आमदार जिकडे कुठे गेलेत त्यांना जर आहे, त्या सरकारला पाडायचं असेल तर त्यांना विधान भवनात यावं लागेल. आम्हाला हे सरकार मान्य नाही आणि आम्ही दुसरं सरकार स्थापन करणार आहोत, असं म्हणणं विधानसभा अध्यक्षांसमोर मांडावं लागेल.

आता तुम्ही म्हणाल की हे सगळं व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेही करता येत असेल, तर तसं करण्यासाठी अनेक अटी आहेत, ज्या अटींमध्ये बाहेर गेलेले आमदार बसू शकत नाहीत, अशी माहिती सुत्रांनी दिलीये, त्यामुळे त्या सगळ्या आमदार महोदयांना गुवाहाटी सोडून मुंबईत यावं लागेल. म्हणजेच काय; ठाकरेंच्या पक्षातील आमदारांना ठाकरेंच्या समोरच ठाकरे सरकारच्या विरोधात आवाज उठवावा लागेल, तेही मुंबईतल्या विधानभवनात.

म्हणूनच आम्ही आधीच क्लिअर केलंय की कोणी कुठंही जाऊद्या, यावं तर मुंबईतच लागतंय भाऊ.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments