राजकारण

राज्यसभेत शिवसेनेची जागा येण्याचे 5 फॅक्टर… आणि भाजपचा पराभव?

राज्यसभेची जागा शिवसेनेला मिळणार की भाजपला मिळणार, याच चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. आपल्याला याच मुद्द्याला सविस्तर पाहायचं आहे.

How Win Shivsena : आता तुम्ही ज्या 5 गोष्टी पाहणार आहात, त्या योग्यच आहेत, असं आम्ही म्हणत नाही, पण काही राजकीय विश्लेषकांकडून येणाऱ्या मुद्द्यांवरच आजचा लेख अवलंबून आहे.

तुम्हाला राज्यसभेचं गणित वाचायचंच असेल तर मग इथे क्लिक करा.

मुंख्यमंत्र्यांनी फोन उचलला नाही आणि संभाजीराजेंचा राजकीय गेम झाला…

तसं पाहिलं तर राज्यसभेला एक जागा निवडून येण्यासाठी एका उमेदवाराला 42 आमदारांचा पाठिंबा गरजेचा असतो. तशी आकडेवारी पाहिली तर ना भाजपकडे पद्धतशीर आकडेवारी आहे, ना शिवसेनेकडे. मात्र हे दोन्ही पक्ष एका जागेवर दावा करतात. आता जो दावा केला जातोय, तो संपूर्णरित्या अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यामुळे केला जातोय, हे नक्की. मात्र त्याच अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याचं गणित आज आपण पाहणार आहोत.

राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना हे तीन प्रमुख पक्ष सोडून बहुजन विकास आघाडी (03), प्रहार जनशक्ती (02), एमआयएम (02), समाजादी पक्ष (02), मनसे (01), माकप (01), जनसुराज्य सक्ती (01), क्रांतीकारी शेतकरी पक्ष (01), शेकाप (01), रासप (01), स्वाभिमानी (01) अशी आकडेवारी आहे आणि अपक्ष असलेले आमदार 13 आहेत. म्हणजेच प्रमुख पक्ष सोडून 29 आमदार एका जागेसाठी मतदान करणार आहेत. यातील किती आमदार तटस्त राहतील किती शिवसेनेला पाठिंबा देतील आणि किती भाजपला पाठिंबा देतील, हे त्या आमदारांना आणि संबंधित पक्षांना माहिती.

पण याच्यातील बहुतांश आमदारांचा कल महाविकास आघाडीकडे झुकू शकतो, हे नक्की.

आधीपासून असलेली सत्ता

गेल्या अडिच वर्षांपासून महाविकास आघाडी, विशेषत: शिवसेना सत्तेत आहे. त्यामुळे निधी वाटप, मतदास संघातील कामं अशा अनेक गोष्टींसाठी अपक्ष आमदारांना सरकारकडे यावं लागतं. विशेषत: मुख्यमंत्र्यांकडे यावं लागतं, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या उमेदवारांना पाठिंबा देणं, अनेक आमदारांना सोईचं वाटतं.

शिवसेनेसोबत असलेलं नातं

असे अनेक अपक्ष आमदार आहेत, ज्यांचे शिवसेनेसोबत चांगले संबंध आहेत आणि काही स्थानिक पक्षांचीही शिवसेनेसोबत सलगी आहे, त्यामुळे शिवसेनेच्या पडत्या काळात पाठिंबा देणं आणि आपण शिवसेनेसोबत कायम आहोत, हे सांगण्याचा प्रयत्न काही स्थानिक पक्ष या निमित्ताने करतील.

राष्ट्रवादीसोबत असलेलं नातं

राष्ट्रवादी काँग्रेस आणि विशेषत: शरद पवार ही अशी व्यक्ती आहे, ज्यांच्या संपर्कात अनेक आमदार असतात. शरद पवारांबरोबर (काही आमदार सोडले तर) अनेक आमदारांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे जिथे भाजपचा अधिकार राहत नाही, अशा स्थानिक पक्षांच्या आमदारांना, अपक्ष आमदारांना शिवसेनेला पाठिंबा देण्याचं आवाहन राष्ट्रवादीकडून होऊ शकतं.

काहींना सत्तेत मिळालेलं स्थान

प्रहार जनशक्ती, हा फायरब्रँड आमदार बच्चू कडू यांचा पक्ष. या पक्षाचे 2 आमदार आहेत. त्यातल्या त्यात या पक्षाला म्हणजेच बच्चू कडू यांना शिवसेनेने आपल्या वाटेला आलेलं शालेय शिक्षण राज्यमंत्रिपद देऊ केलंय. त्यामुळे असे अजून काही स्थानिक पक्ष आहेत, ज्यांचे आमदार आहेत आणि त्यांना सत्तेतील पक्षांकडून काही ना काही आश्वासन दिलं गेलंय.

भाजपच्या विचारांच्या विरोधात

राज्यात अनेक अपक्ष आमदार आहेत किंवा स्थानिक पक्षांतील आमदार आहेत, जे पूर्णपणे भाजपच्या विचारांच्या विरोधात आहेत. भाजपने हाताळलेल्या अनेक मुद्द्यामुळे भाजपवर नाराज झालेले अनेकजण आहेत, ते आामदार भाजपला कधीच मतदान करणार नाहीत, असं त्यांनीच स्वत: घोषित केलंय. मात्र शिवसेनेला ते मदत करतील की नाही याचीही शाश्वती त्यांनी अद्याप दिलेली नाही, परिणामी भाजपला गरजेचा असलेला पाठिंबा कमी होण्याची शक्यता दाट आहे.

परिणामी अशा सगळ्या गणिताचा विचार केला तर दोन्ही पक्षांकडे गरजेचं असलेलं संख्याबळ नाहीच, आता ते अपक्ष आमदारांना स्वत: कडे कसे वळवतात, हे येणारा काळच सांगेत हे नक्की.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments