राजकारण

एकनाथ शिंदे मुंबईत आलेच नाहीत, तर काय होऊ शकतं?

एकनाथ शिंदे आज मुंबईत येणार, उद्या मुंबईत येणार, अशा चर्चाही आता जुण्या होऊ लागल्या.

Eknath Shinde : एकनाथ शिंदे आज मुंबईत येणार, उद्या मुंबईत येणार, अशा चर्चाही आता जुण्या होऊ लागल्या. त्या आले नाही तर काय होईल, हे जाणून घेणं आता महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. त्यामुळे सगळं काही बाजूला ठेऊन आपण एकनाथ शिंदे आणि त्यांचा संपूर्ण गट मुंबईत आला नाही, तर काय होऊ शकतं, हेच आपण पाहणार आहोत.

एकनाथ शिंदेंच्या बंडाबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल, तर इथे क्लिक करा.

एकनाथ शिंदेंनी 21 तारखेला बंड केलं. आतापर्यंत म्हणजे २७ जूनपर्यंत तरी त्यांनी मुंबईची वाट धरली नाही. त्यामुळे अनेक माध्यमं कायदेशीर गोष्टींचा विचार करत असल्याचं समोर आलं. त्यातलीच एक म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट हा महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचं पत्र राज्यपालांना देऊ शकतात, अशी माहिती आहे. म्हणजेच जर तसं पत्र राज्यपालांना मिळालं, आणि राज्यपालांना बहुमतावर संशय निर्माण झाला, तर राज्यपाल महाविकास आघाडीकडे गरजेइतका बहुमताचा आकडा आहे का, याची तपासणी करण्याचे आदेश देतील. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्व म्हणजेच २८८ आमदारांना मुंबई गाठावं लागेल. विधान भवनात ठाकरे सरकारच्या बाजूने किंवा ठाकरे सरकारच्या विरोधात अविश्वास दाखवावा लागेल.

इथे गरजे इतके म्हणजेच महाविकास आघाडीच्या बाजूने १४४ आमदारांचा पाठिंबा असणं गरजेचं आहे. आता या सगळ्यात शिवसेनेचे गुवाहाटीमध्ये असलेले आमदार जर या बहुमत चाचणीच्या वेळेला हजर राहिले नाहीत आणि बहुमताचा आकडा १४४ पेक्षा खाली गेला, तर मात्र महाविकास आघाडी सरकार पडू शकते. मात्र इथं एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे.

पक्षाच्या नेत्याकडून संबंधित सर्व आमदारांना बहुमतासाठी विधानभवनात हजर राहण्यासाठी व्हीप जारी केला जातो. व्हीप जारी करूनही एखादा आमदार विधानभवनात आला नाही आणि त्या आमदारामुळे सरकार पडलं तर पक्षाचा व्हीप न पाळल्याच्या प्रकरणामुळे संबंधित आमदाराला निलंबित केलं जाऊ शकतं. पुन्हा त्या आमदाराला जनतेतून निवडून यावं लागेल.

म्हणजेच काय तर एकनाथ शिंदे गटातील आमदार मुंबईत आले नाहीत किंवा बहुमतावेळी त्यांचा महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा मिळाला नाही, तर पक्षाचा आदेश न पाळल्याच्या अटीवर शिवसेनेकडून त्या आमदाराला निलंबित केलं जाऊ शकतं.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments