Uncategorizedकारणनॉलेज

Convict Prisoner | शिक्षा भोगत असलेली कैदी कारागृहात काय करतात? कसा असतो दिनक्रम?

एखाद्या गुन्ह्यात शिक्षा झालेले व्यक्ती गुन्हेगार असतो. आणि कोर्टाच्या निर्णयानुसार त्याला शिक्षा दिली जाते

Convict Prisoner : सध्या दिल्लीमध्ये संसदेचे (Parliment) पावसाळी अधिवेशन सुरु आहे. हे अधिवेशन मोठ्या प्रमाणात वादळी ठरताना दिसतय. या अधिवेशनात आत्तापर्यंत तब्बल 27 खासदारांचे (Member Of Parliment) निलंबण करण्यात आलं आहे. (Suspension of MP in Parliament) संसदेत अनेक मुद्दे चर्चेत आले त्यांचपैकी एक मुद्दा म्हणजे कारागृहातील कैद्यांचा मृत्यू. संसदेत एका प्रश्नाच्या दरम्यान हा आकडा सादर करण्यात आला. यामध्ये 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 दरम्यानची आकडेवारी सादर करण्यात आली. यामध्ये 2020-21 मध्ये 1 हजार 940 तर 2021-22 मध्ये 2 हजार 544 कैद्यांचा कोणत्या ना कोणत्या कारणावरून मृत्यू झाला आहे. (Custodial Death Of India)

एखाद्या गुन्ह्यात शिक्षा झालेले व्यक्ती गुन्हेगार असतो. आणि कोर्टाच्या निर्णयानुसार त्याला शिक्षा दिली जाते आणि त्याला हि शिक्षा कारागृहात पूर्ण करावी लागते. कारागृहच्या चार भिंतीच्या मध्ये त्याला आपला शिक्षेचा काळ पूर्ण करावा लागतो. परंतु तो कैदी कारागृहात वेळ कसा घालवतो हा प्रश्न पडला असेल तर त्याचंच हे उत्तर शोधण्याचा प्रयत्न…

न्यायालयाने केलेली शिक्षा म्हणजे कैद्याला एक संधी दिलेली असती. कारागृहात कैद्याचे पुर्नवसन केले जाते त्यामुळे तो परत या मार्गावर वळला नाही पाहिजे यासाठी पुनर्वसनाकडे भर दिली जाते. कैदी शिक्षा भोगून बाहेर पडल्यावर त्याला मानाने जगता यावे स्वतःचा व्यवसाय करता यावा या करिता हि पुनर्वसन केले जाते. शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिल्या जाते. या मध्ये लघु उद्योग, बेकरी उद्योग इत्यादी प्रशिक्षण त्यांना दिले जाते. एकादया कैद्याची आवड ओळखून त्याला प्रोहात्साहित केलं जात. बॉलिवूड अभिनेता संजय दत्त हा ज्यावेळी कारागृहात होता त्यावेळी तो देखील काम करायचा. एका वृतानुसार संजय दत्त हा पिशव्या बनवण्याचे काम करायचा व काही वेळेत रेडिओवर शो करत होता.

येरवाडा कारागृहात तर खुले कारागृह आहे त्यामध्ये पाच वर्ष शिक्षा पूर्ण झालेले कैदी ठेवले जातात. खुल्या कारागृहात कैदी मोकळे असतात. ते येथे शेती, रंगकाम, अशी अनेक काम करतात. तुरुंगाच्या हातमागवर दररोज 5 हजार कपडे तयार केले जातात. येथे तयार झालेले कापड विक्रीसाठीही उपलब्ध असते, अनेक चित्रपटांमध्येही त्यांचा वापर झाला आहे.

कारागृहात दिवस लवकरच सुरु होतो. सकाळी रोज कैद्याची हजेरी पासून या दिवसाची सुरवात होते. प्रत्येक राज्यात कैद्यावर खर्च केल्या जातो. भारतात 52 रुपये एका कैद्यावर खर्च केल्या जातो. सकाळी 7 वाजता चहा, दुपारी 12 वाजता जेवण आणि सायंकाळी 8 वाजता रात्रीचे जेवण मिळते. या जेवणात मसाला वगैरे जास्त वापरला जात नाही.

कारागृहात आपण आपले शिक्षण देखील पूर्ण करू शकता. मुक्त विद्यापीठातून हे शिक्षण पूर्ण करू शकता. कारागृहात काम करून आपण पैसे देखील कमवू शकता. प्रती दिन प्रमाणे आपणास इथे पगार दिला जातो. त्याचप्रमाणे कैद्यासाठी काही कार्यक्रमांचे देखील नियोजन केले जाते. कीर्तन, योगा, प्रवचन, अध्ययम असे कार्यक्रम घेतले जातात. येरवडा कारागृहात तर अनेक दिग्गज कीर्तनकारांची कीर्तन पार पडली आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments