राजकारण

एकनाथ शिंदे यांनी प्रवक्ते म्हणून दीपक केसरकरांची निवड करण्याची 5 कारणे…

आपल्या पक्षाच्या पक्षप्रमुखाला ज्या खुर्चीवरुन बाजूला केलं, त्याच खुर्चीवर एकनाथ शिंदे विराजमान झाले. यात शिवसेनेच्याच अनेक आमदारांचा वाटा आहे म्हणाच, पण भाजपने योग्यवेळी खेळी केली म्हणून शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळालं.

Deepak Kesarkar History : संपूर्ण कहाणी तुम्हाला माहिती आहे, तरी जे नवीन वाचक आहेत, त्यांच्यासाठी संपूर्ण घटनाक्रम थोडक्यात सांगणं आमचं कर्तव्य आहे. 20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदेंनी आपल्याच पक्षप्रमुखांच्या विरोधात बंड केलं, काही आमदार घेऊन गुजरातच्या सुरतला गेले, तिथून ते गुवाहाटीला गेले. तिथे काही दिवस राहिले, तिथून गोव्याला आले आणि गोव्यातून 01 जुलैला मुंबईला आले. यादरम्यान शिवसेनेचे अनेक आमदार उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे गटात सामिल झाले, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. (सविस्तर माहितीसाठी क्लिक करा)

आता प्रकरण दोन समजून घेऊ. एकनाथ शिंदे शिवसेनेत फक्त दुसरा गट करुन शांत राहिले नाहीत, तर भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केलं, आपल्या पक्षाच्या पक्षप्रमुखाला ज्या खुर्चीवरुन बाजूला केलं, त्याच खुर्चीवर एकनाथ शिंदे विराजमान झाले. यात शिवसेनेच्याच अनेक आमदारांचा वाटा आहे म्हणाच, पण भाजपने योग्यवेळी खेळी केली म्हणून शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळालं. आता आपला विषय महत्त्वाचा आहे, ते म्हणजे दीपक केसरकर.

दीपक केसरकर यांचा तसा राजकीय काळ फार मोठा आहे, असं म्हणता येणार नाही, मात्र जो काळ आहे त्या काळातही त्यांनी मोठी सिडी चढलेय, हे विसरुन चालणार नाही. दीपक केसरकरांनी केलेलं स्थानिकपासून राज्य पातळीवरचं राजकारण, हेच त्यांच्या चालाखीचं खरं उत्तर आहे.

दीपक केसरकरांनी सावंतवाडीच्या पालिका निवडणुकीतून राजकारणात प्रवेश केला. तिथून 2009 मध्ये राष्ट्रवादीसोबत गेले. तिथे शिवसेनेतून बाहेर पडलेले नारायण राणे हे दीपक केसरकरांच्या मदतीला आले आणि केसरकरांनी 2009 ची विधानसभा जिंकली. आता 2014 मध्ये मोदी लाट होती, तेव्हा त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि पुन्हा आमदार म्हणून निवडून आले. इथं एक गोष्ट महत्त्वाची की, जेवढा वेळ राष्ट्रवादीत होते, तेवढा वेळ शरद पवारांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केसरकरांनी केला. त्याला यशही आलं. सेनेत येताच केसरकरांना मंत्रिपद मिळालं, तेव्हा त्यांनी ठाकरेंची जवळीक साधण्यास सुरुवात केली. मात्र त्यांची जेवढी जवळीक ठाकरेंशी राहिली, त्याही पेक्षा जास्त भाजपशी झाली.

भाजप-सेनेने एकत्र लढलेल्या निवडणुकांमुळे केसरकर 2019 मध्ये पुन्हा आमदार झाले. मात्र भाजपसोबत जाण्याचं स्वप्न भंग झालं, कारण महाविकास आघाडी सरकारची सुरुवात झाली. या सगळ्या काळात केसरकरांची एकनाथ शिंदेंशी जवळीकही वाढली होती. त्याचा फायदा शिवसेना फुटली तेव्हा झाली. एकनाथ शिंदे यांच्याकडे जेष्ठ राजकारणी कोणी नसल्याचं चित्र आहे. भाजपकडून शिंदे गटाला हवा तितका पाठिंबा मिळतोय, पण जगासमोर येण्यासाठी शिंदे गटाला एक चेहरा हवा होता.

भाजपसोबत जवळीक, पवारांच्या राजकारणाचे अनुभव, मृदू भाषा, माध्यमांना बिनधास्तपणे उत्तरे देणे आणि एकनाथ शिंदे यांच्या जवळचे, या 5 गोष्टींमुळे दीपक केसरकर हे शिंदे गटातील दोन नंबरचे नेते झाले आणि यामुळेच एकनाथ शिंदे यांनी प्रवक्ते म्हणून दीपक केसरकरांची निवड केली.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments