
कधीही आणि कोणासाठी न थांबणारी मुंबई एकेकाळी संपूर्ण ठप्प झाली होती. चाकरमानी मजूर आपापल्या दुकानात होते, रेल्वेने प्रवास करणारे लोक ठिकठिकाणी अडकले होते. मुंबईत जिथे बघावं तिथे पाणीच पाणी होत. टो दिवस होता 26 जुलै 2005. कुर्ला, धारावी परिसरात तर अक्षरशः हाहाःकार माजला होता. लोकल रेल्वे ठप्प झाली होती, तसेच अनेक ट्रेनचं नुकसान झालं होतं. आज सोशल मीडिया असल्यामुळे ट्वीट केलं तरीही बीएमसी आणि रेल्वेकडून मदत पाठवली जाते, पण तेव्हा फेसबुक अथवा ट्विटरचा वापर नव्हता. शेकडो लोकांचा मदतीअभावी जीव गेला होता. पाण्यात अडकलेल्या लोकांना 24 तासांपेक्षा जास्त काळ घरी जाता आले नव्हते .
मुंबईने सर्वात मोठी जीवितहानी करणारा पाऊस यादिवशी अनुभवला होता. यामध्ये एक हजारपेक्षा जास्त लोकांचा जीव गेला होता, तर 14 हजार घरं उद्ध्वस्त झाली होती. 24 तासात तब्बल 944 मिलीमीटर इतका पाऊस पडला होता, जो त्यावेळेस 100 वर्षातला सर्वाधिक पाऊस होता. 37 हजार रिक्षा, 4000 टॅक्सी आणि 900 बेस्ट बसेसचं नुकसान झालं होतं, तर हजारो मोठी वाहनं पाण्यात अडकली होती. ज्यामुळे जवळपास 5.5 बिलियनचं नुकसान झालं होतं.
ज्याप्रमाणे सामान्य मुंबईकरांसह इतरांना या पावसाचा फटका बसला तसाच फटका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना देखील बसला होता. बांद्रा या ठिकाणी मातोश्री आहे, ते कलानगर सखल भागात आहे. तिथे पाण्याचा पूर लोटला होता. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी बांद्रा कलानगरचे मातोश्री हे निवासस्थान सोडून राज ठाकरे यांच्या दादरच्या कृष्णकुंज निवासस्थानी हलवण्यात आलं होत. यावेळी मुंबई महानगरपालीकेवर शिवसेनेची सत्ता होती त्यामुळे शिवसेनेवर जोरदार टीका झाली होती.
त्याचं काळात पत्रकार म्हणून शिवसेना बीटवर काम करणारी वागीस सारस्वती या निमित्ताने राज ठाकरेंच्या निकट संपर्कात होते. आपला वारसदार नेमण्याची वेळ येईल तेव्हा बाळासाहेब अखेर आपलीच निवड करतील अशी व्यर्थ अशा राज ठाकरे मनात बाळगून होते, पण २६ जुलैच्या याप्रसंगी बाळासाहेब यांचा मुक्काम राज ठाकरेंच्या निवासस्थानी असताना राजना कळून चुकलं की आपण भलत्या भ्रह्मात आहोत कदाचित याच कारणाने पुढे त्यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला असावा असा उल्लेख धवल कुलकर्णी लिखित ठाकरे विरुद्ध ठाकरे या पुस्तकात आहे.