अर्थकारण

गौतम अदानींनी पुन्हा घेतलं 14 हजार करोडोंचं लोन, गुजरातला होणार मोठा फायदा…

गौतम अदानी यांच्या नावावर अजून एक रेकॉर्ड नोंद झालाय, तो म्हणजे अदानी यांनी मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांना मागे टाकलंय.

Gautam Adani हे जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती अशी ओळख आहे, पण ही आकडेवारी कधी ना कधी बदलत जाते. आता त्याच आकडेवारीत अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचा नंबर लागलाय. गौतम अदानी यांच्या नावावर अजून एक रेकॉर्ड नोंद झालाय तो म्हणजे अदानी यांनी मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांना मागे टाकलंय. याचाच अर्थ अदानी हे जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती म्हणून समोर आलेत.

यावर्षी म्हणजे 4 एप्रिल 2022 रोजी 100 अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये अदानींनी एन्ट्री केली आाहे. जेव्हा 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती एका व्यक्तीकडे असेल, तेव्हा त्या व्यक्तीला सेंटबिलियनर्स म्हणतात. याचवेळी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास ते आता फोर्ब्सच्या यादीत 10 व्या क्रमांकावर असल्याची माहिती आहे. याचाच अर्थ फक्त आशिया खंडाचा विचार केला तर त्यामध्ये अदानी हे पहिल्या, तर मुकेश अंबानी हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

फक्त मागच्या वर्षीचा म्हणजेच एप्रिल 2021 चा विचार केला तर अदानींची एकूण संपत्ती 57 अब्ज डॉलरच्या आसपास होती. अदानींकडे सध्या 200 अब्ज डॉलर्सचे एकत्रित बाजार भांडवल असलेल्या 07 कंपन्या आहेत. 

आता याच गौतम अदानी यांनी एका प्रोजेक्टसाठी 14 हजार करोडचं लोन घेतल्याची माहिती समोर येत आहे. सरकारी बँक एसबीआयकडून (State Bank of India) 14,000 करोड रुपयांचं लोन मागितलं आहे. या पैशांनी गुजरातमध्ये मोठा प्लांट उभा केला जाणार आहे. गुजरातच्या मुंद्रामध्ये पीव्हीसी प्लांट (PVC Plant) उभारण्याची अदानींची योजना आहे.

ब्युझिनेस वर्तमान पत्र द मिंटने दिलेल्या माहितीनुसार या प्रोजेक्टची सुरुवातीची इन्स्टॉलमेंट 19 हजार करोड आहे. डेट आणि इक्विटीच्या माध्यमातून हा पैसा उभा केला जाण्याची शक्यता आहे. या प्रोजेक्टचे कामकाज फ्लॅगशिप कंपनी अदानी एंटरप्राइजेजकडून पाहिलं जाणार आहे.

याच्याआधी मार्च 2022 मध्ये अदानी एंटरप्राइजेसच्या नवी मुंबई इंटरनॅशनल एयरपोर्टने बँकेंकडून 12,770 करोड रुपये जमा केले आहेत. सध्याच ग्रीनफील्ड कॉपर रिफायनरी प्रोजेक्टसाठी अदानी कंपनीने 6,071 करोड रुपये जमा केले आहेत. त्यामुळे पीव्हीसी प्रोजेक्टसाठी लोन घेण्याचा विचार कंपनीकडून केला जात आहे.

नवभारत टाईम्सच्या मते नवी मुंबई एयरपोर्टप्रमाणे गुजरातमध्ये सुरु होणाऱ्या प्रोजेक्टसाठी घेतल्या जाणाऱ्या लोनला अंडरराइट केलं जाणार आहे आणि नवी मुंबई एयरपोर्टप्रमाणे या प्रोजेक्टचा हिस्सा काही बँकांकडे दिला जाणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सच्या नुसार अदानी ग्रुपचं कर्ज आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 40.5 टक्क्यांनी वाढलं आहे, याचाच अर्थ 2.21 लाख करोड रुपयांच्या आसपास गौतम अदांनींवर कर्ज आहे. मागच्या आर्थिक वर्षात अदानींवर 1.57 लाख करोड रुपये कर्ज होतं.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments