घटनाराजकारण

Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगत सिंग कोश्यारी राजभवनातल्या किचनमध्ये गेले आणि कर्मचारी झाले अवाक…

Bhagat Singh Koshyari : महाराष्ट्रात राज्यपाल आले तेव्हापासून अनेक किस्यांमुळे राज्यपाल चर्चेचा विषय ठरले आहेत.

Bhagat Singh Koshyari Statement : राज्यपाल भगत सिंग कोशारी (Bhagat Singh Koshyari) यांनी राज्यपालपदाची सूत्रं हातात घेतल्यानंतर थोड्याच दिवसात राज्यात निवडणुका झाल्या. त्यानंतर सत्तास्थापनेचं मोठं नाट्यही घडलं. कोश्यारींनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) आणि अजित पवारांना (Ajit Pawar) अचानक शपथ दिल्यानंतर त्यांच्यावर भाजपची बाजू घेत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. यानंतर देखील अनेकवेळा राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा संघर्ष पाहायला मिळत होता.असाच काहीसा वाद पुन्हा उफाळून येत आहे. आता नवीन वक्तव्यामुळे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी चर्चेत आले आहेत. (Bhagat Singh Koshyari Controversial statement)

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास येथे पैसेच शिल्लक राहणार नाहीत, असं वक्तव्य केलं. ते अंधेरी येथे एका कार्यक्रमात बोलत होते. (Maharashtra Governer Controversial Statement)

महाराष्ट्रात राज्यपाल आले तेव्हापासून अनेक किस्यांमुळे राज्यपाल चर्चेचा विषय ठरले आहेत. राज्यपाल नियुक्त 12 आमदार असोत अथवा पदवी विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे असुद्या यावरून राज्यपाल अगदी चर्चेचा विषय ठरले आहेत. असाच रंजक किस्सा राजभवनात घडला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील 78 वर्षीय कोशारी यांना महाराष्ट्रात राज्यपाल म्हणूम नेमले. ते नेहमी साधं धोतर, खादीचा कुर्ता आणि त्यावर जॅकेट त्यावर काळ्या रंगांची टोपी असा त्यांचा पेहराव. भगत सिंग कोशारी यांनी कारभार स्वीकारून जेमतेम 50 दिवस झाले होते.

राजभवनातील एका कर्मचाऱ्याने पत्रकारांना हा किस्सा सांगितला होता, लेखक आणि पत्रकार कमलेश सुतार यांच्या 36 दिवस या पुस्तकात या किस्स्याचे वर्णन केले आहे. कोशारी यांना पहाटे लवकर उठायची सवय होती. पहाटे लवकर उठून सुर्योदयापूर्वी ते चहा घेतात. सुरवातीला तिथल्या स्टाफला त्यांचा दिनक्रम माहीत नव्हतं, एके दिवशी स्टाफ गाढ झोपेत असताना कोशारी सवयीप्रमाणे सुर्योदयापूर्वी उठले आणि थेट राजभवनातील किचनमध्ये गेले.

‎त्यांच्या येण्याने काही कर्मचाऱ्यांना जाग आली. महामहिम स्वतः स्वयंपाक घरात आलेले पाहून सर्वजण आश्चर्य चकित झाले. घाबरलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांनी अत्यंत नम्रपणे सांगितलं, काळजी करू नका मला चहा पत्ती आणि साखर कुठे आहे तेवढे सांगा मी स्वतः माझ्या साठी चहा बनवून घेईन. अत्यंत साध्या राहणीमानाने भगत सिंग कोशारी यांनी सर्वांची मन जिंकली होती.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments