लोकल

देशातील सर्वात उंच मेट्रो स्टेशन उभारतंय आपल्या मुंबईत…

आता या सगळ्यात एक गोष्ट अशी होणार आहे, जी ऐकून आपण घाबरू शकतो.

Kanjurmarg Metro Station : देशात एक्सप्रेस ट्रेन आली, लोकल ट्रेन आली, मेट्रो आली आणि पाठोपाठ मोनो रेलही आली. आता हे सगळं अनेक शहरांमध्ये आहे, त्यात मुंबई खास कशी, तर मुंबई एका गोष्टीसाठी खास ठरली आहे. ती म्हणजे देशातील सर्वात उंच मेट्रो स्टेशन…

देशातील सर्वात उंच मेट्रो स्टेशन उभारलं जातंय ते मेट्रोच्या सहाव्या मार्गिकेवर. मेट्रोची सहावी मार्गिका ही स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी अशी जोडलेली आहे. आता मेट्रो – 6 ही कुठून कुठून जाते, तेही पाहा. स्वामी समर्थ नगर, आदर्श नगर, मोमिन नगर, जेव्हीएलआर, श्याम नगर, महाकाली केव, सिप्झ व्हिलेज, साकी विहार रोड, राम बाग, पवई तलाव, आयआयटी पवई, कांजुरमार्ग पश्चिम आणि विक्रोळी अशी मेट्रो धावणार आहे.

आता या सगळ्यात एक गोष्ट अशी होणार आहे, जी ऐकून आपण घाबरू शकतो. जेव्हा आपण या मार्गावर प्रवास करु आणि आपली मेट्रो कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावर येईल, तेव्हा आपण समुद्र सपाटीपासून तब्बल ३० मीटर उंचीवर असू, म्हणजे असं समजून चला की एका इमारतीच्या 10 मजल्यावर आपण उभे असणार आहोत. सांगायचा मुद्दा म्हणजे स्वामी समर्थनगर ते विक्रोळी या दरम्यानच्या मेट्रो 6 मार्गिकेवरील कांजुरमार्ग मेट्रो स्टेशन हे मुंबईतील आणि पर्यायी देशातील सर्वात उंच मेट्रो स्टेशन असणार आहे. या प्रोजेक्टचं काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच ‘एमएमआरडीए’कडून केलं जातंय.

आपण जर पवईकडून विक्रोळीकडे येऊ, तेव्हा आपल्याला कांजुरमार्गच्या ठिकाणी मोठा उतार जानवेल, जर मेट्रोच्या गणितात विचार केला तर 39 मीटरची ही दरी असू शकते. अशा उतारावर मेट्रो धावली तर अपघाताची शक्यता जास्त आहे, त्यामुळे तेवढा उतार भरुन काढण्यासाठी सुमारे 30 मीटर उंचीवर हे स्थानक बाधण्याचं काम सुरु झालंय. या स्टेशनच्या खाली असणारा खांब तब्बल 25 मीटर उंचीचा असणार आहे.

आपण ज्या मार्गिकेबद्दल बोललो, त्या मेट्रो 6 ची लांबी 14.7 किलोमीटर असणार आहे. आतापर्यंत 6700 कोटी रुपयांचा खर्च या मार्गिकेला बनवण्यासाठी अपेक्षित धरला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments