कारणनॉलेज

Ed Raid : ईडीने जप्त केलेला पैसा, मालमत्ता, दागिने ईडी काय करते?

ईडीला एखाद्या व्यक्तीच्या आर्थिक गैरव्यवहारा संबधित माहीती मिळाली तर त्यासंदर्भात खोलात जाऊन ईडी माहीती घेते.

केंद्रीय तपास यंत्रणेचा भाग (Part of Central Agency) असलेल्या सक्त वसुली संचालनालय (Enforcement Directorate) म्हणजेच ईडीच्या कारवाईवरून राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ईडीकडून मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात येतात. ईडीने पश्चिम बंगालमध्ये मोठी कारवाई केली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील मंत्री पार्थ चटर्जी यांचे निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून तब्बल 20 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. ईडीने जप्त केलेल्या पैशांचा ढिगारा जप्त केला आहे. आतापर्यंत ईडीने अनेक ठिकाणी कारवाई केली असून संपत्ती पैसे आणि दागिने देखील जप्त केले आहेत. (Arpita Mukherjee Ed Raid) ईडीने जप्त केलेली मालमत्ता ईडी काय करते? जाणून घेऊयात…

ईडीला एखाद्या व्यक्तीच्या आर्थिक गैरव्यवहारा संबधित माहीती मिळाली तर त्यासंदर्भात खोलात जाऊन ईडी माहीती घेते. कागदपत्र तयार करून संबंधित व्यक्तीला नोटीस पाठवली जाते. त्याला चौकशीला बोलवून चौकशी केली जाते. संबंधित व्यक्ती दोशी आढळल्यास त्याव्यक्तीला अटक केली जाते. काही लिंक लागल्यास अटक करताना पैसे, मालमत्ता, दागिने जप्त जप्त करण्याचे आदेश दिले जातात.

चौकशी दरम्यान जप्त केलेल्या रोख रकमेचा पंचनामा केला जातो. एकूण किती रक्कम जप्त करण्यात आली, 200, 500 किंवा इतर किती नोटा आहेत, असे पंचनाम्यात नमूद केले जाते. या नोटा वेगवेगळ्या केल्या जातात. जप्त केलेल्या नोटांवर काही खुणा किंवा काहीही लिहिलेले असल्यास ते तपास यंत्रणेकडे जमा केले जाते, जेणेकरून ते न्यायालयात पुरावा म्हणून सादर करता येईल.

बाकीची रक्कम बँकांमध्ये जमा केले जातात. तपास यंत्रणा जप्त केलेली रक्कम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये केंद्र सरकारच्या खात्यात जमा करतात. काही वेळा काही रक्कम तपासाठी ठेवण्याची गरज भासते, तर तपास यंत्रणा अंतर्गत आदेशाने खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत ते स्वतःकडे जमा ठेवतात.

PMLAच्या कलम 5 (1) अंतर्गत मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार ईडीला आहे. मालमत्तेची जप्ती न्यायालयात सिद्ध झाल्यानंतर, ही मालमत्ता PMLA कलम 9 अंतर्गत सरकारच्या ताब्यात जाते. जेव्हा ईडी कोणतीही मालमत्ता जप्त करते तेव्हा त्यावर एक बोर्ड लावला जातो, ज्यावर ही मालमत्ता विकली जाऊ शकत नाही किंवा वापरता येणार नाही.

तपास यंत्रणेने सोने-चांदी, दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू जप्त केल्या तर त्याचाही पंचनामा होतो. किती सोने किंवा किती दागिने किंवा किती मौल्यवान वस्तू जप्त केल्या याची संपूर्ण माहिती पंचनाम्यात नमूद केली जाते. सोने-चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू जप्त करून सरकारी तिजोरीत ठेवले जातात. जप्त केलेल्या वस्तूंवर न्यायालय अंतिम निर्णय घेते, मग ते रोख रक्कम किंवा दागिने किंवा मालमत्ता असो. खटल्याच्या प्रारंभी, जप्त केलेली मालमत्ता पुरावा म्हणून न्यायालयात सादर केली जाते. जर न्यायालयाने जप्तीचे आदेश दिले तर संपूर्ण मालमत्ता सरकारच्या ताब्यात जाते. जप्तीला न्यायालयात किंवा उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यास, अपीलकर्त्याने जप्त केलेली मालमत्ता कायदेशीर असल्याचे सिद्ध केल्यास, त्याला सर्व जप्त केलेली मालमत्ता परत मिळते.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments