
महाराष्ट्राच्या (Maharashtra ) राजकारणात नामकारणाच्या विषयावरून मोठ्या प्रमाणात गदारोळ झालेला दिसतोय. ठाकरे सरकारने औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं, तर शिंदे सरकारने त्याच औरंगाबादचं नामकरण छत्रपती संभाजीनगर केलं, पण मित्रांनो फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही काही असे भाग आहेत, ज्यांना थेट इंग्रज गव्हर्नरांची नावे दिलेत.
मुंबईतील रस्ते आणि चौकांच्या नामकरणाच्या निरनिराळ्या गोष्टी आजही वाचतो. स्वातंत्र मिळाल्यानंतर आपण अनेक नावं बदललेत. खास करून इंग्रजी नावांच्या जागी भारतीय पुढाऱ्यांची नावे आणली. जिथे ज्या नेत्याचा पुतळा तिथे त्या नेत्याचं नाव होतं, पण ते सगळे पुतळे आता राणीच्या बागेत एकत्र आले. आता फक्त हुतात्मा चौक ते चर्चगेटच्या दरम्यान काही पुतळे कायम आहेत. यामध्ये दादाभाई नवरोजी, गोपाळ कृष्ण गोखले, ग. गो. रानडे, जमशेटजी, जीजीभाई, फिरोजशहा मेहता यांचे पुतळे अजुनही त्याच ठिकाणी दिसतात.
आता असं सगळं सुरु असताना अशी अनेक ठिकाणं आहेत, जी अजूनसुद्धा इंग्रजांच्या नावांनी समोर येताहेत. मुंबईतल्या जवळजवळ पंधरा रस्त्यांना मुंबईच्या ब्रिटिश गव्हर्नरांची नावे दिलेली तुम्हाला दिसून येतील. त्यामध्ये लॅमिग्टन रोड, ऑर्थर रोड, नेपियन सी रोड, सॅन्डहर्स्ट रोड, ग्रँड रोड, फॉकलंड रोड, हॉर्नबी रोड, माजगावच्या पलीकडचा रे रोड, कुलाब्याचा वुड हाउस रोड यांचा समावेश आहे.
मुंबईतील पाच मार्गांना म्यूनिसिपल कमिशनरांची नावे दिलेली तुम्हाला दिसून येतील. कॅडेल रोड, कारमायकेल रोड, हार्वे रोड, पेडर रोड हे कमिश्नरांनी एकेकाळी मुंबईत पाय ठेवला होता. कॅनिडी सी फेस आणि कॅनिडी ब्रिज या दोन्ही ठिकाणांच्या मागे असलेले असे एक भाग्यवान नाव आहे मायकल केनेडी नावाच्या ब्रिटिश इंजिनिअरचे.
मायकल केनेरी हे त्यावेळेच्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे सेक्रेटरी होते. कफ परेडचे नाव हे 1901-1902 दरम्यान मुंबई महानगरपालिकेत असलेल्या स्थायी समितीच्या अध्यक्षांच्या नावावरून देण्यात आले होते. कुलाब्यात समुद्र किनारी फूटपाट दिसतात, त्या बांधण्याच्या सूचनादेखील यांनीच दिल्या होत्या. तसेच 1923 ते 28 या दरम्यान वॉर्डन नावाचा एक मुख्य सचिव होता. त्याने मुंबईतील सर्व जमिनींचे पद्धतशीरपणे सर्वेक्षण केले, त्यामुळे एका रस्त्याला त्यांचेही नाव देण्यात आलं.
मुंबईतील गल्ली-बोळांपासून रस्त्यांना आणि रस्त्यांपासून पूलांना अशी इंग्रजी नावं दिलेली तुम्हाला पाहायला मिळतील. पण त्यासाठी तुम्हाला वंटास मुंबईसोबत मुंबईची सफर करावी लागेल, हे नक्की.