खूप काही

मुंबईतील शिक्षणाच्या प्रसाराची नाळ नाना शंकर शेट यांच्याशी का जोडली जाते?

फेब्रुवारी मार्च महिना उजाडला की सर्व विध्यार्थी आपल्या आपल्या अभ्यासात व्यस्त झालेले दिसतात.

Nana Shankar sheth : फेब्रुवारी मार्च महिना उजाडला की सर्व विध्यार्थी आपल्या आपल्या अभ्यासात व्यस्त झालेले दिसतात. कारण या वेळेतच दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा चाललेल्या असतात. परीक्षेचे टेन्शन त्यात पालकांच्या सूचना अशी अनेक चित्र आपण पाहात असतो. या भितीमध्ये उदय होतो ते अनेक क्लासेसचा. मुंबई, ठाण्यासारख्या शहरात तर बक्कळ पैसा खर्च करून मुलांना शिक्षण दिले जाते. आता ही सत्य परिस्थिती असली तरी काही दिवसांपुर्वी मुंबईत शिक्षणाची ही परिस्थिती नव्हती.

सण 1668 मध्ये ममला मुंबईच्या कारभाराची सनद मिळाली. आपण जे काही बोलतो किंवा आपली भाषा, व्यवहार इथल्या लोकांना समजावेत या उद्देशाने मुंबईत शिक्षणाचा प्रसार सुरू झाला. सुरुवातीला मुंबईमध्ये इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जात होते. नंतर वेगवेगळ्या भाषेत शिक्षण देण्यास सुरुवात झाले. ही शिक्षणपध्दती मर्यादित आणि व्यवहारबंद होती, कारण भारतीयांना जास्त शिक्षण दिलं तर ते आपल्याविरुध्दच बंड करतील अशी ईस्ट इंडिया कंपनीची भुमिका होती, त्यामुळे या शिक्षण प्रसाराला गती मिळण्यासाठी एकोणिसावे शतक उजाडावे लागले.
019PHO000000201U00051000%5BSVC2%5D
सन 1818 मध्ये मराठ्यांची सत्ता लयास जाऊन इंग्रजांची पुर्णपणे एकहाती सत्ता उदयास आली. सर्वत्र इंग्रजांचे वारे वाहू लागले. त्यामुळे त्यांच्या मुलांना तसेच मुंबईतील काही राजेंच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी मुंबईत “बॉम्बे एज्युकेशन सोसायटी”नावाच्या शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेने मुंबईत शाळा उघडल्या. त्यामध्ये हिंदू, मुसलमान, पारशी अशा धर्माची मुले-मुली इथे शिकू लागली. अशा विद्यार्थ्यांची संख्या 1820 साली 250 असल्याचे दिसून आले आणि इथूनच शिक्षण प्रसाराचे कार्य सुरू झाले.
 
हे सगळं सुरू असताना यावर भल्या मोठ्या संकटांचा सामना करावा लागत होता. विध्यार्थी शिकायला आले तर साहित्य नसे, पालकांच्या मनात अनेक प्रश्न होते, जनतेचा या कार्याला अल्प प्रतिसाद लाभत होता, राज्य प्रशासनाच्या दृष्टीने ही स्थिती हालाकीची आहे. हे चाणाक्ष गव्हर्नर माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांच्या लक्षात आले. तेव्हा या परिस्थितीत महत्वाचे बदल करण्यासाठी त्यांनी जनतेची मदत घेण्याचे ठरवले. यासाठी मुंबईतील प्रतीष्ठीत नागरिकांच्या मदतीने त्यांनी सण 1822 मध्ये “बॉम्बे सिटी स्कूल अँड बुक सोसायटी” या नावाची नवीन शिक्षण संस्था निर्माण केली. या संस्थेचा उल्लेख आपल्याकडील जुन्या पुस्तकात “मुंबईची हिंदू शाळा आणि शाळा पुस्तक मंडळी” म्हणून केल्याचे आढळते. यावेळी शिक्षण प्रसाराच्या या कार्यात जगन्नाथा नाना शंकर शेट  यांचे नाव अग्रभागी आढळते.
 
नाना शंकरशेट हे मुलांनी शाळेत यावं, शिकावं, त्यांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांच्या पालकांना कळकळीची विनंती करत. इतकेच नव्हे तर स्वतःचे पैसे खर्च करून विद्यार्थ्यांना लागणारे शिक्षणाचे साहित्य खरेदी करून देत. 
 
शंकरशेट यांचं हे काम पाहून महर्षी दादाभाई नवरोजी त्यांनी त्यांचा गौरवही केला होता. ज्यांनी शिक्षणाचे बीज रूजत घातले, त्याची निगा राखली आणि आज दृष्टीस पडणारी त्याची निरामय होईपर्यंत, अभिवृद्धी होईपर्यंत त्याचा परिपोष केला. अशा गोड शब्द महर्षींनी शंकरशेटांसाठी उद्गारले होते.
 
त्या शिक्षण प्रसारकतेच्या आघाडीच्या कार्यात जगन्नाथ शंकर शेट हे पहिले मुंबईकर होते. विशेष गंमत म्हणजे नाना शंकरशेट यांच्या प्रेरणेतून 1850-51 मध्ये मुंबई शहराची शैक्षणिक पाहणी करण्यात आली. या पाहणीत प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 5803 भरली. अर्थातच मुंबईतील शिक्षणामध्ये झालेले बदल व विध्यार्थी, पालकांमध्ये शिक्षणाची निर्माण झालेली आवड; याचे सर्व श्रेय मुंबईचे शिल्पकार नाना शंकर शेट यांना दिलं जातं.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments