कारणराजकारण

राज ठाकरे शिवसेना सोडणार बातमी छापून आली आणि शिवसैनिकांनी वर्तमान पत्राची होळी केली

शिवसैनिक हा आक्रमक समजला जातो याची प्रचिती अनेक वेळा संपूर्ण महाराष्ट्राला आणि संपूर्ण देशाला आली आहे.

सध्या महाराष्ट्रात आणि देशात शिंदे गटाचे बंड सर्वत्र चर्चेत आहे. शिवसेना कोणाची? चिन्ह कोणाचं यावरून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. अनेक नेते आमदार, खासदार, नगरसेवक, पदाधिकारी यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. एकीकडे जेव्हा हाच शिंदे गट गुवाहाटी येथे असताना म्हटलं जात होत की मतदार संघात कसे पोहचतात हे आम्ही बगतो. परंतु हे सर्व आमदार मुंबईत आले आणि स्वतःच्या मतदारसंघात देखील केले आणि सर्व घडलं मात्र उलट. लोकांनी त्यांना विरोध करण्याऐवजी याच आमदारांचे सत्कार आणि जंगी स्वागत करण्यात आले.

शिवसैनिक हा आक्रमक समजला जातो याची प्रचिती अनेक वेळा संपूर्ण महाराष्ट्राला आणि संपूर्ण देशाला आली आहे. शिवसेनेतील हे काही पहिलं बंड नाही यावर राज ठाकरेंनी बंड केलं होतं त्यावेळेस देखील शिवसैनिक आक्रमक झाले होते बंड करायच्या अगोदर देखील एका वृत्तपत्रात त्यांच्या राजीनाम्या विषयी मथला आल्याने शिवसैनिकांनी त्या अंकाची होळी केली होती.

राज ठाकरे सेना सोडून जाणार अशी चर्चा सुरु असताना बाळासाहेब ठाकऱ्यांनी मनोहर जोशी आणि संजय राउतांना शिष्टाईसाठी राज ठाकऱ्यांकडे पाठवले. यावेळी आक्रमक सैनिकांनी संजय राऊतांच्या गाडीची तोडफोड केली होत. ज्या दिवशी राज यांनी शिवसेना सोडल्याची अधिकृत घोषणा केली, त्याच दिवशी महाराष्ट्र टाइम्सने पहिल्या पानावर राज ठाकरे शिवसेनेचा त्याग करण्याच्या पवित्र्यात असल्याची बातमी छापली होती.

ही बातमी दिली होती पत्रकार सचिन परब यांनी दिली होती. परब यांना शिवसेनेच्या पक्षकार्यालयात एक ज्येष्ठ शिवसेना नेते भेटले. ते राज ठाकरेंचे निकटवर्ती होते. त्यांच्या बोलण्यात त्यांनी सुभाष देसाईंसारख्या उद्धवसमर्थकांच्या विरोधात बोलले होते. त्यांच्या बोलण्यातून नाराजी स्पष्ट जाणवली होती. ते नारायण राण्यांच्या वाटेने जाण्याचा विचार करताहेत की काय? नंतर सरळ राज ठाकऱ्यांनाच फोन केला अन् स्पष्टच विचारलं, ‘तुम्ही शिवसेना सोडणार आहात का?’ त्यांचं गुळमुळीत उत्तर परब यांना मिळालं आणि त्यातून बरंच सांगून गेलं. त्यांनी स्पष्ट नकार दिला नाही. म्हणाले, ‘यावर आपण नंतर बोलू. आणि यावर बातमी छापली गेली. असा उल्लेख धवल कुलकर्णी लिखित ठाकरे विरुद्ध ठाकरे या मध्ये आहे.

ही बातमी महाराष्ट्र टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडिया दोन्हीकडे प्रसिद्ध झाली. भडकलेल्या शिवसैनिकांनी या दोन्ही वर्तमानपत्रांच्या अंकांची होळी केली. उलट राज यांचे समर्थक त्यांच्या दादरच्या निवासस्थानी गोळा होऊ लागले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments