आपलं शहरघटनालोकल

Mumbai Local : मुंबईची लोकल सुरु झालेला तो दिवस मुंबईत सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर झाला

Mumbai Local : ताशी 35 मैलांच्या वेगाने ही गाडी 55 मिनिटांनी ठाणे स्टेशनवर पोचली, त्या वेळी तिथे जमलेल्या प्रचंड जनसमुदायाने तिचे अभूतपूर्व स्वागत केले.

मुंबईच्या इतिहासात मुंबईच्या लोकलला वेगळं महत्व आहे. (Mumbai Local History) मुंबईच्या लोकलला मुंबईची लाईफलाईन असं म्हटलं जात. याच लाईफलाईन मधून अनेक मुंबईकर नागरिक आपला प्रवास करतात. (Mumbai Local Called Mumbai’s Lifeline)

अखेर लोकल धावली…

शनिवार दिनांक 16 एप्रिल 1853 हा दिवस मुंबापुरीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा दिवस होता. भारताच्या कोनाकोपऱ्यात याच दिवशी लो हमार्गाचे जाळे विणले गेले. त्याची सुरुवात या दिवसापासून झाली. त्या दिवशी दुपारी साडेतीनच्या मुहूर्तावर देशातलीच नव्हे तर आशिया खंडातली पहिली आगगाडी तेव्हाच्या बोरीबंदर स्टेशनातून धुराची वलये सोडीत दिमाखाने ठाण्याकडे निघाली. जवळच असलेल्या मुंबईच्या किल्ल्यावरून आजचा फोर्ट भाग गव्हर्नरच्या बँडच्या ताफ्याने या आगाडीला सलामी दिली. तत्कालीन मुंबईकराच्या जीवनातील या अभूतपूर्व घटनेचा तो दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित करण्यात आला होता.

दुपारपासून हजारो लोक बोरिबंदर स्थानकाजवळ ठाण मांडून राहिले होते. एवढेच नव्हे तर बोरिबंदरपासून भायखळ्यापर्यंत लोहमार्गाच्या दुतर्फा हा अविस्मरणीय प्रसंग डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी हजारो लोक दाटीवाटीने उभे होते. कित्येक लोक झाडांच्या फांद्यांवर बसून ते अदभूत दृश्य पाहत होते. बोरिबंदर ते ठाणे हा चोवीस मैलांचा लोहमार्ग टाकण्यासाठी ग्रेट इंडियन पेनिनसुला ह्या कंपनीने दहा हजार पौंड खर्च केले होते. याच सुवर्णक्षणासाठी दहा हजार मजूर कित्येक महिने राबले होते. जेम्स बर्कले नावाचा इंग्रज इंजिनियर ह्या कामावर देखरेख करण्यासाठी नियुक्त केला गेला होता.

ज्या दिवशी लोकल धावणार त्यादिवशी बोरिबंदर स्टेशन निरनिराळ्या फुलांच्या माळांनी पताकांनी आणि निरनिराळ्या रंगांच्या झेंड्यांनी सजवले होते. सर्वांत उंचावर इंग्रजांचा युनियन जॅक फडकत होता. तीनशे फूट लांबीचा बोरिबंदरवरील प्लॅटफॉर्म सुंदर आच्छादन घालून सजवला होता. त्याचप्रमाणे पश्चिमेकडच्या बाजूला पाचशे खास नागरिक बसतील एवढा मोठा मंडप उभारला होता. हे पाहुणे रेल्वे कंपनीचे खास आमंत्रित होते. कंपनीचे दोन अधिकारी कॅप्टन आणि कोच यांनी आमंत्रित वर्गाला डब्यातील त्यांच्या जागा दाखवण्यासाठी मदत केली आणि त्यानंतर निमंत्रित पुरुष वर्गाला आपापल्या इच्छेनुसार कुठेही बसण्याची मोकळीक दिली.

शासकीय अधिकान्यांसाठी राखीव डबा होता. त्यात न्यायमूर्ती यार्डले, नौसेना अधिकारी सर हेन्री लीक व त्याची पत्नी आणि जी. आय. पी. कंपनीचे अध्यक्ष स्वॅन्सन आणि मुंबईची इतर प्रतिष्ठित मंडळी यांना बसवण्यात आले.

तिसऱ्या वर्गाच्या डब्यात बसलेल्या सैनिकांच्या ताफ्याने बँडवर “गॉड सेव्ह द कीन” च्या सुरांची सुरवात केली. जवळच्या सेंट जॉर्जेस किल्ल्यावरून अठरा तोफांनी गर्जना केली, आणि आशियातील पहिल्या आगगाडीचे चौदा डबे आपल्या कुशीत पाचशे भारावून गेलेले प्रवासी घेऊन बोरिबंदरच्या बाहेर पडले. या गाडीला वाफेवर चालणारी दोन काळी कुळकुळीत इंजिने होती. रुळांच्या दुराफ असलेले आणि उपरांवर व झाडांवर बसलेले लोक ही गाडी जेव्हा मुंबईच्या भर वस्तीतून भायखळ्याच्या दिशेने निघालेली दिसली तेव्हा आनंदाने बेहोष होऊन तिचा जयजयकार करीत होते. गाडीने भायखळा सोडले आणि याच्या दिशेने धावू लागली.

थांब्यासाठी गाडी सायन स्थानकात 15 मिनिटं थांबली…

आजच्या जलद गाड्या जे स्टेशन सोडून देतात त्या सायन स्टेशनवर ही पहिली गाडी चांगली पंधरा मिनिटे थांबली होती. कारण सायन ही शीव होती. येथे इंजिनासाठी पाणी घेतले गेले. चाकांना वंगण लावले गेले. ताशी 35 मैलांच्या वेगाने ही गाडी 55 मिनिटांनी ठाणे स्टेशनवर पोचली, त्या वेळी तिथे जमलेल्या प्रचंड जनसमुदायाने तिचे अभूतपूर्व स्वागत केले.

या निमंत्रित प्रवाशांना ठाण्यामध्ये सजवलेल्या शामियान्यात मेजवानी देण्यात आली. ज्यांच्यामुळे ही रेल्वे उभी राहिली ते सर्व कंत्राटदार, अभियंते आणि कामगार यांचा गौरव करण्यात आला. या महत्वपूर्ण शुभारंभाला त्या वेळचे गव्हर्नर नॉर्ड फॉकलंड सुट्टीस असल्याकारणाने येऊ शकले नाहीत. पण त्यांच्या पत्नी उपस्थित होत्या.

पहिल्या गाडीचा परतीचा प्रवास सुरु…

सर्व प्रवासी परतीच्या प्रवासासाठी आपापल्या जागेवर जाउन बसले. परतीचा प्रवास सुरू झाला आणि ही गाडी चाळीस मिनिटांत बोरिबंदरला पोचली.

संध्याकाळी सात वाजता जेव्हा ही गाडी बोरिबंदरला परत आली तेव्हा सुद्धा तिथे हजारो लोक तिच्या स्वागतासाठी ताटकळत उभे होते. दुसऱ्या दिवशी जी.आय.पी. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ह्या गाडीमधून सर जमशेटजी जीजीभाई व इतर मान्यवर अशा पारशी कुटुंबांच्या समूहाला एक ठाणे सहल घडवून आणली. सोमवार दिनांक 18 मे 1853 पासून ही आगगाडी सामान्य प्रवाशासाठी खुली झाली.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments