फेमस

ठरलं, या महिन्यात कोस्टल रोडची सुरुवात, पण फायदा कोणाला, क्रेडिट कोणाचं?

मुंबईमध्ये कोस्टर रोडचं काम कितपर्यंत आलंय, हे जाणून घेण्याची अनेकांना इच्छा आहे. त्यावर आजची माहिती आधारीत आहे.

Coastal Road Work : तुम्हाला कोणी विचारलं की मुंबईतील सगळ्यात मोठा प्रोजेक्ट कोणता सुरु आहे, तर त्याला बिनधास्तपणे नाव सांगून टाका की कोस्टल रोड. तसे इतरही प्रोजेक्ट मुंबईमध्ये सुरु आहेत, मात्र कोस्टल रोड हा त्यापेक्षा मोठा प्रोजेक्ट असला पाहिजे, असं आम्हाला तरी वाटतं. त्याचं कारण समजून घेण्याआधी कोस्टल रोडची महत्त्वाची गोष्ट समजून घेऊ.

1200000000000 रुपये म्हणजे 12000 कोटी रुपयांचा खर्च कोस्टल रोडला येण्याची शक्यता बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) सांगितलं होतं. आता त्याच कोस्टल रोडचं 58 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती संबंधित खात्याने दिला आहे.

ऑक्टोबर 2018 मध्ये कोस्टल रोडच्या कामाला सुरुवात झाली, अपेक्षेप्रमाणे पुढील 4 वर्षांमध्ये म्हणजेच 2022 पर्यंत या प्रोजेक्टचं काम पूर्ण होणं गरजेचं होतं, मात्र लॉकडाऊनमुळे या कामाची गती मंदावली आणि हे काम आता नोव्हेंबर 2023 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोस्टल रोडला साधारण 111 हेक्टर इतकी जागा लागणार आहे, त्यातील 107 हेक्टर म्हणजेच 97 टक्के रस्ता हा अरबी समुद्रातून जाणार आहे. 29.2 किमी लांबीचा कोस्टल रोड मरीन लाइन्सपासून सुरू होईल आणि कांदिवलीला संपेल. या रोडवर बोगदे, इंटरचेंज, पूल, फूट ओव्हर ब्रीज, पादचारी अंडरपास, स्वच्छतागृहही बांधण्याचं काम सुरुय.

असं म्हटलं जातं की कोस्टर रोड हा शिवसेनेचा खास करुन आदित्य ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यामुळे याचं क्रेडिट BMC सह शिवसेनेला जातं असं म्हटलं जातं. मुंबई उपनगरातून म्हणजेच बोरिवलीपासून विरारपर्यंत राहणारे अनेक रहिवाशी हे चर्चगेटपर्यंत प्रवास करत असतात. मध्येच लागणारं अंधेरी, दादर, बांद्रा, प्रभादेवी अशा इंडस्ट्रिअल ठिकाणांवर मोठ्या प्रमाणात लोक येत असतात. त्या सगळ्यांना खासकरुन रोजच्या रोज आपली गाडी घेऊन येणाऱ्यांना कोस्टल रोड फायद्याचा ठरेल. मुंबईतील वाढती गर्दी, वाढतं ट्राफिक अशा अनेक समस्यांना कोस्टल रोड हा पर्याय ठरू शकतो. आता थोडं कोस्टल रोडच्या रचनेवर नजर टाकणं गरजेचं आहे.

20 मीटर रुंद असलेल्या या कोस्टल रोडच्या जागेत उद्यान, क्रीडांगण, खुले सभागृह, सायकल ट्रॅक, स्वच्छतागृहे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था असणार आहे. या प्रकल्पात प्रत्येकी 1,625 वाहनांसाठी, अशी तीन भूमिगत पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. एकूण प्रोजेक्टमधील 22 टक्के क्षेत्र कोस्टल रोडच्या बांधकामासाठी आणि उरलेली 78 टक्के जागा सार्वजनिक सुविधा उभारण्यासाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती आहे.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments